फेब्रुवारी महिन्यात ‘या’ पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?

फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुख्य पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत पेरण्या केल्या तर पिकांची वाढ जोमात होणार असून उत्पादनातही फरक पडणार आहे. शेतकऱ्यांना या हंगामात मार्चमध्ये मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यात 'या' पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?
फेब्रुवारी महिन्यात पिकांची जोपासणा आणि पालभाज्याची लागवड याबाबत कृषी संशोधन संस्थेने सल्ला दिला आहे.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:13 PM

मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुख्य पिकांच्या (Crop Sowing) पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे (Agricultural Research Institute) भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत पेरण्या केल्या तर पिकांची वाढ जोमात होणार असून उत्पादनातही फरक पडणार आहे.  (Farmer) शेतकऱ्यांना या हंगामात मार्चमध्ये मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.पेरणी करण्यापूर्वी बियाणांवर रायझोबियम आणि फॉस्फरस विद्रव्य जीवाणूंचा मिसळणे गरजेचे आहे. या बीज प्रक्रियेमुळे बियांणा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. मूगामध्ये-पुसा विशाल, पुसा बैसाखी, पीडीएम-11, एसएमएल-32 तर उडीदमध्ये पंत उडीद-19, पंत उडीद-30, पंत उडीद-35 आणि पीडीयू-1 या वाणाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भेंडी लागवड करताना प्रमुख जातींमध्ये ए-4, परबानी क्रांती, अर्का अनामिका या बियाणांची निवड करावी. लागवड करण्यापूर्वी शेत भिजवणे गरजेचे आहे.हवामान लक्षात घेता या आठवड्यात टोमॅटो, मिरची, भोपळ्याची भाजी या तयार रोपांची लागवड करू शकतात.

पालेभाज्यांना हवे हलके पाणी

आता तापमानामध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीन हा सल्ला 27 फेब्रुवारीपर्यंत असल्याचे सांगितले आहे. पिकांची पेरणी आणि आहे ते जोपासण्यासाठी हा सल्ला आहे.या सप्ताहात वाढते तापमान व जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पिके व भाजीपाल्यात हलके पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गहू पिकाचे असे करा व्यवस्थापन

बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगावरही लक्ष ठवणे गरजेचे आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हाच्या पिकातील काळा, भुरा किंवा पिवळा चट्टा आल्यावर पिकामध्ये डिथान एम-45 हे 2.5 ग्रॅम हे 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. पिवळ्या चट्टा घालवण्यासाठी 10-20 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिकचे तापमानात हा आजार होत नाही. काळा चट्टा घालवण्यासाठी फवारणी करताना 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि आर्द्रता विरहित हवामान आवश्यक असते.

भाज्या आणि मोहरीत चेपाचा आजार

सध्याचे कोरडे व वाढते तापमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला व मोहरीच्या पिकांमध्ये चेपा या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी भाज्यांची तोड झाल्यावर इमिडाक्लोप्रिड 0.25-0.5 मि.लि. हे 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे.फवारणीनंतर आठवडाभर भाजीपाल्याची तोडणी करु नये.बियाणे असलेल्या म्हणजेच भेंडी, गवार अशा भाज्यांवर चेपाने केलेल्या हल्ल्याकडे विशेष लक्ष द्या.

संबंधित बातम्या :

Rabi Season: हरभऱ्याचे क्षेत्र वाढले-उत्पादन घटले, अंतिम टप्प्यात नेमके काय झाले ?

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.