Plastic Mulching : शेती वापरले जाणारे प्लास्टिक मल्चिंग धोक्याचेच, परिक्षणानंतर धक्कादायक अहवाल समोर
मायक्रोप्लास्टिकमुळे माती आणि पर्यावरणाची तर हानी होतेच पण मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्लास्टिक मानवाच्या फुफ्फुसात आणि रक्तामध्ये देखील प्रवेश करते. प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीतील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढते तसेच अन्न दूषित होते, त्यामुळे मानवासाठीही घातक ठरत असल्याचे टॉक्सिक लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितले आहे.
मुंबई : काळाच्या ओघात उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक पध्दतीचा (Agribusiness) शेती व्यवसयामध्ये वापर होत आहे. यामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी काही तोटेही यामध्ये आहेत. आता किडीपासून बचावासाठी आणि जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी (Plastic Mulching) प्लास्टिक मल्चिंगचा वापर वाढत आहे. वाढत्या वापराबरोबरच त्याचे काही दुष्परिणामही लक्षात घेणे तेवढेच गरजेचे आहे. प्लास्टिक मल्चिंगबाबत नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. प्लास्टिक मल्चिंगमुळे देशातील अनेक भागांतील मातीत मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. टॉक्सिक लिंक या पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. शेतकरी बागायती आणि शेतीसाठी प्लास्टिक मल्चिंगचा वापर करतात.याबाबत (Maharashtra) महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतातील मातीचे नमुने परीक्षणाचा अभ्यास करुन शेतातील मातीत मायक्रोप्लास्टिकचा शोध घेण्यात आला आहे. जमिनीत ओलावा आणि उत्पादन वाढीसाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो.
मानवी आरोग्यासाठीही घातकच
मायक्रोप्लास्टिकमुळे माती आणि पर्यावरणाची तर हानी होतेच पण मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्लास्टिक मानवाच्या फुफ्फुसात आणि रक्तामध्ये देखील प्रवेश करते. प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीतील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढते तसेच अन्न दूषित होते, त्यामुळे मानवासाठीही घातक ठरत असल्याचे टॉक्सिक लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितले आहे.
माती परिक्षणात नेमके काय आढळले
मायक्रोप्लास्टिक्स कृषी उत्पादनांद्वारे मानवी शरिरामध्येही प्रवेश करु शकतात एवढेच नाही तर त्यापासून हानीही होऊ शकते. केवळ ओल्याच ठिकाणी नव्हे तर डम्पिंग साइटवरही मायक्रोप्लास्टिकच्या खुणा या अहवालात आढळल्याचे टॉक्सिक्स लिंकमधील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मातीच्या नमुन्यांमध्ये जड धातूंचे अस्तित्वही आढळून आल्याचेही अहवालात आढळून आले आहे. आर्सेनिक, शिसे, बोरॉन आणि कॅडमियम यांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले. ओल्या जमिनीतील धातूंचे वजन आणखी वाढलेले आढळून आले.
80 नागरिकांमध्ये प्लास्टिकचे कण आढळतात
अहवालामध्ये असे आढळले आहे की, प्लास्टिक प्लॅटफॉर्मवर वापरले जाणारे प्लास्टिक सामान्यत: कमी-घनतेचे असतात. त्यामुळे मानवी रक्तामध्येही पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्याचेही अहवालात म्हटले आहे. या तपासणीमध्ये तब्बल 80 टक्के नागरिकांमध्ये हा लहाण कण आढळून आला आहे. त्यामुळे शेती व्यवसयात वापरला जाणाऱ्या मल्चिंगवर अन्य पर्याय शोधावा लागणार असल्याचा सूर या अहवालातून समोर आला आहे.