PM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. PM Kisan Samman Scheme
PM Kisan Samman Nidhi Scheme नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. लवकरच आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये 14 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.66 कोटी शेतकऱ्यांना 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी 14 मे रोजी आठव्या हप्त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. (PM Kisan Samman scheme 8th instalment released soon check your record because some names deleted)
अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली
पीएम किसान योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचं काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये परत घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबर त्यांची नाव हटवण्यास सुरुवात केली आहे.
तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?
- स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा. स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल. स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल. स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.
संबंधित बातम्या:
पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात कधी येणार? अशाप्रकारे जाणून घ्या हप्त्याचा स्टेटस
किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 31 मार्चपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटका
(PM Kisan Samman scheme 8th instalment released soon check your record because some names deleted)