PM KISAN : शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे काय होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या देशभरातील 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला होता. त्यानंतर आता सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत आहे. तर योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे काय असा सवाल होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही निधीचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून परतावा तर घेतला जात आहे शिवाय त्यांची बॅंक खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PM KISAN : शेतकऱ्यांचा 'सन्मान' होण्यास सुरवात, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे काय होणार ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:55 AM

बीड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (PM Kisan Samman Nidhi Yojana) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या देशभरातील 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला होता. त्यानंतर आता सर्वच लाभार्थी (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत आहे. तर योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे काय असा सवाल होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही निधीचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून परतावा तर घेतला जात आहे शिवाय त्यांची बॅंक खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच नियमितता येणार असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

अन् 5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल खणाणले

1 जानेवारीपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर योजनेचे पैसे जमा झाल्याचे एसएमएस येऊ लागले होते. बीड जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग होण्यास सुरवात झाली आहे. सर्वांनाच हा निधी मिळालेला नसला तरी चार ते पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी योजनेचा लाभार्थी राहणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले आहे. हा निधी थेट बॅंकेत जमा होणार असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही.

अपात्र शेतकऱ्यांबाबत कठोर निर्णय

योजनेचा उद्देश बाजूला सारुन अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही लाभ घेतला होता. छाणनी प्रक्रियेदरम्यान ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली होती. महाराष्ट्र राज्यातही ही संख्या 6 लाखाच्या घरात होती. त्यामुळे या अपात्र शेतकऱ्यांचे खाते तर बंद केले जाणार आहे शिवाय त्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याकडून आतापर्यंत लाभ घेतलेली रक्कमही वसुल केली जात आहे. ही रक्कम वसुल होताच बॅंक खाते बंद केले जात आहे. त्यामुळे भविष्यात अनियमितता होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात 42 लाख अन् महाराष्ट्रात 4 लाख शेतकरी अपात्र

देशातील 42 लाख 16 हजार अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार 497 अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून आता 358 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. महाराष्ट्रात असे 4 लाख 45 हजार 497 अपात्र असून ते सरकारचे 358 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महसूल विभागाकडून ही वसुली केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडून हा परतावा घेण्यातही आला आहे. ‘दै. लोकमत’ च्या वृत्तानुसार भविष्यात योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून हे खातेच बंद केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : विनापरवाना ऊसाचे गाळप, 38 साखर कारखान्यांना 38 कोटींचा दंड

पीकविमा तक्रारीचा ओघ कायम, भरपाईची प्रक्रिया कासवगतीने, शेतकऱ्यांच्या अर्जावर तोडगा काय?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वेळ अमावस्या, शहरांमध्ये शुकशुकाट-शेत शिवार गजबजणार

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.