PM Kisan scheme Narendra Modi Live: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं: नरेंद्र मोदी
PM Kisan 9th Instalment : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील.
PM Kisan scheme Narendra Modi Live नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे देखील यावेळी उपस्थित आहेत.
खाद्यतेलात आत्मनिर्भर करण्याचं आवाहन
खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत. या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही.
उत्तर पूर्व भारत आणि अंदमान निकोबार मध्ये पामशेती शक्य
खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.
LIVE NEWS & UPDATES
-
केंद्र सरकारकडून गव्हाची विक्रमी खरेदी
सरकार ने खरीफ हो या रबी सीज़न, किसानों से MSP पर अब तक की सबसे बड़ी खरीद की है।
इससे, धान किसानों के खाते में लगभग 1 लाख 70 हज़ार करोड़ रुपए और गेहूं किसानों के खाते में लगभग 85 हज़ार करोड़ रुपए डायरेक्ट पहुंचे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 9, 2021
-
खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा
खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत. या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मोदी म्हणाले
-
-
शेतकऱ्यांमुळं भारताची गोदामं भरली: नरेंद्र मोदी
कोरोना विषाणू महामारीच्या काळात देशानं शेतकऱ्यांच कष्ट पाहिलं आहे. कोरोना महामारीत शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केलं. यूरियाचं पुरवठा कायम ठेवला आहे. डीएपीच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोनामुळे वाढल्या. डीएपीच्या वाढत्या किंमतीचा बोजा शेतकऱ्यांवर पडून दिला नाही. डीएपीच्या किमती कमी ठेवण्यासाठी 12 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली.
-
नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांशी संवाद सुरु
नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांशी संवाद सुरु
अब से कुछ दिन बाद ही 15 अगस्त आने वाला है।
इस बार देश अपना 75वां स्वतंत्रता दिवस मनाने जा रहा है।
ये महत्वपूर्ण पड़ाव हमारे लिए गौरव का तो है ही, ये नए संकल्पों, नए लक्ष्यों का भी अवसर है।
इस अवसर पर हमें तय करना है कि आने वाले 25 वर्षों में हम भारत को कहां देखना चाहते हैं: PM
— PMO India (@PMOIndia) August 9, 2021
-
नरेंद्र मोदींचा काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्याशी संवाद
नरेंद्र मोदींनी काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेली त्या शेतकऱ्यानं एक वर्ष अगोदर उत्पादन डबल झाल्याचं सांगितलं.
-
-
नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याशी संवाद सुरु
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याशी संवाद साधला.
-
नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील शेतकरी देवेंद्र जापडेकर यांच्याशी संवाद सुरु
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील शेतकरी देवेंद्र जापडेकर या फळ उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत. देवेंद्र जापडेकर हे आंबा उत्पादक आहेत. आता ते केळी देखील पिकवतात. देवेंद्र जापडेकर ते करत असलेल्या शेतीविषयी माहिती देत आहेत. कोरोना आल्यानं समस्या निर्माण झाली होती. कृषी विभागानं आमचे फोन नंबर लोकांना दिले. लोकांचे फोन येत असल्यानं त्यांनी फळप्रक्रिया सुरु करण्याचं ठरवलं. अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची माहिती मिळाली. 16 लाखांचं लोन होतं. 2 आठवड्यात कर्ज मंजूर झालं असल्याचं त्यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितलं.
-
नरेंद्र मोदींचा गोव्याच्या प्रतिभा वेलीपी यांच्यासोबत संवाद सुरु
नरेंद्र मोदींचा गोव्याच्या प्रतिभा वेलीपी यांच्यासोबत संवाद सुरु आहे. प्रतिभा वेलीपी या मिश्र शेती करत आहेत. प्रतिभा वेलीपी या गोव्यात धान, काजू आणि इतर शेती करतात.
-
11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत आहेत. पीएम किसान योजना, पीक विमा योजना याचा फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएम किसान योजनेद्वारे 6 हजार रुपये देतात हा विषय नाही. नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
-
9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये वर्ग होणार
आज हा आपल्या साठी हा अभिमानाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पाठवले जाणार आहेत, असं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो, असं तोमर म्हणाले.
-
आतपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार रुपये वर्ग
आतपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी दरवेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून हप्ता जारी करतात
-
अर्जाची स्थिती कुठे पाहायची?
जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.
-
थोड्याच वेळात नववा हप्ता जारी होणार
थोड्याच वेळात नववा हप्ता जारी होणार
Hon’ble PM Shri @narendramodi Ji will release the 9th instalment of PM Kisan Samman Nidhi Scheme today at 12:30 PM. #PMKisan pic.twitter.com/gFwHTY9eZg
— Agriculture INDIA (@AgriGoI) August 9, 2021
Published On - Aug 09,2021 12:26 PM