PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी, देशाला खाद्यतेलात आत्मनिर्भर करा, पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना नवं मिशन

PM Kisan Samman Nidhi 9th Instalment पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता आहे. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवले.

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी, देशाला खाद्यतेलात आत्मनिर्भर करा, पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना नवं मिशन
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 1:43 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता आहे. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी देवेंद्र जापडेकर यांच्याशी नरेंद्र मोदींशी संवाद साधला.

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु

खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत.  या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मोदी म्हणाले

9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी वर्ग

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये वर्ग कण्यात आले आहेत. 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजारांचा नववा हप्ता जारी करण्यात आला आहे.

11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग

केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर हे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत आहेत. पीएम किसान योजना, पीक विमा योजना याचा फायदा झाला असल्याचं  त्यांनी सांगितलं. पीएम किसान योजनेद्वारे 6 हजार रुपये देतात हा विषय नाही. नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी 11  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

अर्ज कुठे करायचा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.

इतर बातम्या:

PM Kisan scheme Narendra Modi Live: नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील देवेंद्र जापडेकर यांच्याशी संवाद

PM Kisan scheme: नरेंद्र मोदी पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी करणार, शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार, तुमचं नाव तपासलं का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.