Farmers Protest: ‘बाप राबतो म्हणून अन्न मिळतं, सोशल मीडियावरचे वाचाळवीर त्याचीच चेष्टा करतायत’

सोशल मीडियावर कृषी कायद्यांची भलामण करणाऱ्यांचा आका का बोका वरती बसला आहे. या वाचाळवीरांना हाणण्याची गरज आहे | Ajit Nawale

Farmers Protest: 'बाप राबतो म्हणून अन्न मिळतं, सोशल मीडियावरचे वाचाळवीर त्याचीच चेष्टा करतायत'
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 11:48 PM

नाशिक: फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे (Farm laws) हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे म्हणत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरु असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले (Ajit Nawale) यांनी उपस्थित केला. बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत असल्याची टीका अजित नवले यांनी केली. (Farmers protest in Nashik against farm laws)

ते मंगळवारी शिरपूर येथे झालेल्या किसान सभेच्या मोर्चात बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. सोशल मीडियावर कृषी कायद्यांची भलामण करणाऱ्यांचा आका का बोका वरती बसला आहे. या वाचाळवीरांना हाणण्याची गरज आहे, असे अजित नवले यांनी म्हटले.

आज शिरपूर येथे मोर्चाचा मुक्काम आहे. सकाळी मोर्चेकरी मध्यप्रदेश मार्गे दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. याठिकाणी मेधा पाटकर आपल्या सहकाऱ्यांसोबत मोर्चाचं स्वागत करण्यासाठी पळसनेरमध्ये येतील. जर मध्यप्रदेश बॉर्डरवर मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडवलं नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत हे शेतकरी राजस्थानमधील कोटापर्यंत पोहोचतील.

‘आपलं दुर्दैव वरती खोटारडा माणूस बसलाय, 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरंल’

या सभेत अजित नवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. आपलं दुर्दैव वरती खोटारडा माणूस बसला आहे. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. मुठभर लोक सांगणार आपण शेतात काय लावलं पाहिजे. भयंकर थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असे अजित नवले यांनी सांगितले.

‘मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत’

देशातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. या देशात फक्त पाच टक्के लोकांचा विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. सर्वठिकाणी कंत्राटी प्रणाली आली आहे. शेतकरी संकटात आला तर संपूर्ण समाज संकटात येईल, असा इशारा किसान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.

संबंधित बातम्या:

‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’

Delhi farmers protest | आंदोलक शेतकऱ्यांचे थेट ब्रिटनच्या खासदारांना पत्र, काय आहे नेमकं कारण?

(Farmers protest in Nashik against farm laws)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.