राजकीय स्वार्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल

कृषी कायद्यातील सुधारणा ह्या (agriculture law ) शेतकऱ्यांच्या हीताच्या आहेत. उलट काही दशकांपूर्वीच या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते पण त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकरी हीताचे निर्णय घेतले नाहीत. तर काही पक्षांनी या सुधारणा कायद्यांना पाठिंबाही दिला होता मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांनी काळानुरुप भुमिका बदलली यापेक्षा दुर्भाग्य ते काय असा सवाल(PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे खडेबोल विरोधकांना सुनावलेले आहेत.

राजकीय स्वार्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 6:44 PM

मुंबई : कृषी कायद्यातील सुधारणा ह्या (agriculture law ) शेतकऱ्यांच्या हीताच्या आहेत. उलट काही दशकांपूर्वीच या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते पण त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकरी हीताचे निर्णय घेतले नाहीत. तर काही पक्षांनी या सुधारणा कायद्यांना पाठिंबाही दिला होता मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांनी काळानुरुप भुमिका बदलली यापेक्षा दुर्भाग्य ते काय असा आरोप(PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे खडेबोल विरोधकांना सुनावलेले आहेत.

सुधारित कृषी कायद्याला विरोध म्हणजे विरोधकांची ‘बौद्धिक अप्रामाणिकपणा’ आणि ‘राजकीय फसवणूक’ असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांकडून कृषी कायद्याला होत असलेला विरोध म्हणजे राजकीय फसवेगिरी आहे. कारण यामधील अनेक राजकीय पक्षांनी या कायद्याचे समर्थन केले होते. पण काळाच्या ओघात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भुमिका बदलली जात असल्याचा आरोपही मोदी यांनी केला आहे.

सुधारित कायद्यामुळे तळागळातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पुर्वीच्या सरकारने लागू केलेल्या कायद्यामध्येच एक बदल केला असून शेतकरी हीताच्या अनुशंगानेच बदल केल्याचे त्यांना स्पष्ट केले आहे. या कायद्याबाबत चुकीची माहिती हे विरोधक समाजात पसरवत आहेत. हे कठोर निर्णय काही दशकांपूर्वीच घेणे गरजेचे होते पण विरोधकांची इच्छाशक्तीचा आभाव आणि राजकीय स्वार्थ यामुळे त्यांनी हे निर्णय घेतलेले नव्हते.

कामगार आणि कृषी कायदे हे मागे घेण्याबाबत विचारणा झाली असता मोदी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी हे कठोर निर्णय घेण्यात आले असून यामध्ये आता बदल होणार नसल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.

विरोधकांनीही दिले होते आश्वासन

सरकारने लागू केलेल्या कायद्याला काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. मात्र, राजकीय स्वार्थमुळे या पक्षांनी आपली भुमिका ही बदलेली आहे. यासंबंधी भाजप पक्षाने वेळोवेळी आपली भुमिका ही मांडलेली आहे. विशेषत: पंजाब आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागात शेतकऱ्यांचा एक गट अशा कायद्यांना विरोध करत आहे. मात्र, यासंबंधी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण त्याची पूर्तता झाली नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

देशाच्या हीताची भुमिका महत्वाची

विरोधकांची देश चालवण्यासंदर्भात वेगळी विचारसरणी आहे. कारण देश उभारणीसाठी सरकार चालवण्यावर त्यांचा विश्वास आहे. पण माझा उद्देश हा देशात विकात झाला पाहिजे हा असल्याचेही त्यांनी या मुलाखती दरम्यान स्पष्ट केले.

काँग्रेसवर हल्लाबोल

कृषी कायद्यातील सुधारणेबाबत विरोधी पक्षांनी वेळोवेळी भुमिका ही बदलेली आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या हीताचे निर्णय घेतले नाहीत तर केवळ पक्षावर लक्ष केंद्रीत केल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले. pm-modi-tells-opposition-against-agriculture-law-for-political-self-government

संबंधित बातम्या :

केळीची गोडी वाढली, आवक घटल्याने दरात वाढ

‘गोऱ्हा नाही कालवडच होणार’, गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु

पंचनाम्यानंतर पुढची प्रक्रीया काय? शेतकऱ्यांना प्रतिक्षा मदतीची

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.