Pomegranate Cultivation : डाळिंब क्षेत्राची राज्यात घट परराज्यात वाढ, काय आहेत कारणे?

अगदी माळरानावरही चांगल्या पध्दतीने येणाऱ्या डाळिंबाकडे शेतकरी वळाले होते. शिवाय अपेक्षित उत्पन्नही मिळत होते. असे असताना यंदा राज्यात डाळिंबाची सरासरी एवढी लागवड झालेली नाही. सरासरीच्या केवळ 5 टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे भारतीय डाळिंब संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Pomegranate Cultivation : डाळिंब क्षेत्राची राज्यात घट परराज्यात वाढ, काय आहेत कारणे?
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 4:52 PM

सांगली : उत्पादन वाढीच्या दृष्टीने फळबागांचे क्षेत्र वाढणे महत्वाचे आहे. त्याअनुशंगाने गेल्या काही वर्षात बदल होत आहे. अगदी माळरानावरही चांगल्या पध्दतीने येणाऱ्या डाळिंबाकडे शेतकरी वळाले होते. शिवाय अपेक्षित उत्पन्नही मिळत होते. असे असताना यंदा (Maharashtra) राज्यात (Pomegranate Cultivation) डाळिंबाची सरासरी एवढी लागवड झालेली नाही. सरासरीच्या केवळ 5 टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे भारतीय डाळिंब संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Untimely Rain) वातावरणाती बदल, अनियमित पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हा बदल झाला आहे. तर परराज्यात पोषक वातावरण असल्याने गुजरात, राजस्थान या ठिकाणी क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम सध्या वावरात असलेल्या पिकांवर तर झालाच आहे पण आगामी हंगामावरही होत असल्याचेच यामधून दिसून येत आहे.

फळबागांचे उत्पन्न वातावरणावरच अवलंबून

वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होतो. यंदाच्या वर्षात याची प्रचिती शेतकऱ्यांना आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या बदलामुळे द्राक्ष, आंब्याचे उत्पादन तर घटणार आहेच पण हंगाम लांबणीवर पडल्याने योग्य दर मिळतो की नाही याची चिंता आता फलबागायतदार शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. डाळिंब तर माळरानावरही घेता येणारे पीक आहे. पण एकरी लाखोंचा खर्च करुनही वातावरणातील बदलामुळे नुकसान होणार असेल तर पारंपारिक पिकेच घेतलेली बरी अशी धारणा शेतकऱ्यांची होत आहे. त्यामुळे यंदा राज्यात सरासरीच्या केवळ 5 टक्के क्षेत्रावरच लागवड झालेली आहे.

खर्चात वाढ उत्पादनात घट

शेती व्यवसयामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. शिवाय काळाच्या ओघात या शेती पध्दतीमध्ये बदलही होत आहे. देशात डाळिंबाचे सर्वाधिक म्हणजे 1 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. असे असताना यंदा यामध्ये कमालीची घट झाली आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांची मानसिकता बदलत आहे. बदलत्या वातावरणाबरोबर या फळबागांवर तेलकट, मर, कुजवा, आणि पीन होल बोअर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे तर दुसरीकडे अतिवृष्टी अनियमित पाऊस यामुळे उत्पन्न घटले आहे. अशा दुहेरी संकटामुळेच शेतकरी डाळिंब लागवडीचे धाडस करीत नाही.

राज्यात या भागाचे घेतले जाते डाळिंबाचे उत्पादन

राज्यात प्रतिकूल परस्थिती असली तरी मात्र, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये पोषक वातावरणामुळे क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड केली जाते मात्र, यंदा लागवडीचे क्षेत्र हे घटलेले आहे. गेल्या तीन वर्षातील बदलत्या वातावरणाचा परिणाम यंदा प्रकर्षाने जावणू लागला असल्याचे अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

स्वप्न सत्यात, महिन्याभरापूर्वीच निर्णय आता मंजुरीही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे खुशखबर..!

Sorghum Crop : त्यांनी सिंमेंटच्या जंगलात ज्वारीचे पीक घतले पण उत्पादनासाठी नाही तर…

Smart Marathwada: पीक लागवड ते शेतीमालाच्या निर्यातीचा मान मराठवाड्यातील 76 शेतकरी उत्पादक कंपन्यांना, वाचा सविस्तर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.