सरकारच्या मदतीतून ‘तो’ पुन्हा घेणार ‘सर्जा-राजा’ ची जोडी, दुर्घटनेत झाला होता बैलजोडीचा मृत्यु

खरिपातील पिकावर नैसर्गिक संकट हे कायम आहे. ते कमी म्हणून की काय, नांदेड येथील एका तरुण शेतकऱ्याच्या बैलजोडीचा विद्युत प्रवाह संचारल्याने मृत्यू झाला होता. याच बैलजोडीवर सदरील शेतकऱ्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होता. गाव प्रतिनीधी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला मदत करण्याचे ठरविले असून या रकमेतूनच शेतकरी हा पुन्हा बैलजोडी घेऊ शकणार आहे.

सरकारच्या मदतीतून 'तो' पुन्हा घेणार 'सर्जा-राजा' ची जोडी, दुर्घटनेत झाला होता बैलजोडीचा मृत्यु
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 8:48 AM

नांदेड : शेती उत्पादनातून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ पाहवयास मिळतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही. खरिपातील पिकावर नैसर्गिक संकट हे कायम आहे. ते कमी म्हणून की काय, नांदेड येथील एका तरुण शेतकऱ्याच्या बैलजोडीचा विद्युत प्रवाह संचारल्याने मृत्यू झाला होता. याच बैलजोडीवर सदरील शेतकऱ्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होता. गाव प्रतिनीधी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला मदत करण्याचे ठरविले असून या रकमेतूनच शेतकरी हा पुन्हा बैलजोडी घेऊ शकणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील रमेश राठोड या तरुण शेतकऱ्याकडे सर्जा-राजाची खिलार बैलजोडी होती. बैलगाडीला मिळालेले भाडे आणि रोजनदारी यावरच रमेश आपल्या कुटूंबाचा गाडा चालवत असत. दिवसभर काम करुन रमेश राठोड हे शेतामध्येच बैलजोडी बांधत होते. सर्वकाही सुरळीत असताना 11 सप्टेंबर रोजी त्यांनी सर्जा-राजाला शेतामध्ये बांधले होते. मात्र, या दोन्ही बैलांमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने मृत्यु झाला होता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल रमेश समोर होता. पोळा उत्साहात केल्यानंतर हे संकट राठोड कुटुंबीयावर ओढावले होते.

पावसाने खरिप पिकाचे नुकसान यातच हाताला काम नाही आणि बैलजोडीचा झालेला मृत्यू यामुळे रमेश यांना नैराश्य आले होते. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कुंदनसिंह राठोड, सरपंच नंदाबाई चव्हाण यांनी रमेश राठोडची परिस्थिती प्रशासनासमोर मांडली त्यामुळे मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Poor farmers to take bullock pairs with the help of administration

सर्व प्रकार शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर

रमेश राठोड हे कुटूंबियांसमवेत शेतामध्येच राहत होते. रविवारी रात्री बैलजोडी बांधलेल्या ठिकाणी अचानक आग लागली. शॅार्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, हा सर्व प्रकार डोळ्यासमोर घडूनही राठोड हे काही करु शकले नाहीत. झालेला प्रकार अधिकारी आणि गावच्या नागरिकांना सांगताना त्यांचे डोळे हे पाणावले होते.

गावकऱ्यांनाकडूनही मदतीचा हात

रमेश राठोड या शेतकऱ्याची परिस्थीती तशी बेताचीच. दिवसभर हाताला काम तर पोटाला भाकरी याची जाणीव ग्रामस्थांना होतीच. त्यामुळेच दुर्घटना घडताच सरपंच नंदाबाई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते कुंदनसिंह राठोड, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी रमेशला धीर देत प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर त्याकरिता प्रयत्नही केले.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायला हवे?

शेतकऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार हे घडतातच. त्वरीत अशा घटनेची माहिती प्रशासकीय यंत्रणेला देणे आवश्यक आहे. शिवाय गावातील तलाठी, महाविरणचे अधिकारी यांनाही सांगून तहसीदार यांच्या आदेशाने पंचनामा करुन घ्यायला हवा. यानंतरच प्रत्यक्ष मदतीच्या प्रक्रियेला सुरवात होते.

अन् राठोड यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी पंचनामा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी हे राठोड यांच्या शेतावर आले होते. माहूर तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनाम्याबाबत सुचना केल्याने संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा केल्याने आता मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित इतर बातम्या :

खरिपातील पिकासह ऊसाचीही पडझड, लातुर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

आश्चर्य : वेताशिवाय 25 वर्षीय गाय देतेय दुध, कृषी तज्ञही झाले अवाक्

घरबसल्या मिळवा जमिनीच्या दाव्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ॲप सुरु

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.