Hingoli : मृगाच्या पहिल्याच पावसामध्ये दाणादाण, केळी बागा आडव्या, खरिपाला मात्र पोषक वातावरण
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्या कुरुंदा आणि गिरगांव मंडळात केळीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे त्याच क्षेत्रावर मान्सूनपूर्व पावसाची अवकृपा राहिलेली आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दोन्ही मंडळातील केळीच्या बागा ह्या आडव्या झाल्या आहेत.विशेष म्हणजे सध्या निर्यातक्षम केळीची काढणी सुरु होती. या केळीच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते त्याचेच अधिक प्रमाणाक नुकसान झाले आहे.
हिंगोली : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा उशिरा (Pre Monsoon) पावसाला सुरवात झाली. राज्याच्या राजधानीसह (Marathwada) मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यामध्येही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुले खरिपाला पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी अंतिम टप्प्यात असलेल्या (Banana Orchard) केळी बागा मात्र आडव्या झाल्या आहेत. आतापर्यंत पावसामुळे फळबागांचेच अधिक नुकासान झाले असून आता मान्सूनपूर्व काळातही हीच मालिका सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळी बागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तोडणी काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना तालुक्यातील करुंदा व गिरगाव मंडळात मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. यामध्ये केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. ऐन काढणीच्या प्रसंगीच वादळी वाऱ्याने बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
निर्यातक्षम केळीच मातीमोल
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्या कुरुंदा आणि गिरगांव मंडळात केळीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे त्याच क्षेत्रावर मान्सूनपूर्व पावसाची अवकृपा राहिलेली आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दोन्ही मंडळातील केळीच्या बागा ह्या आडव्या झाल्या आहेत.विशेष म्हणजे सध्या निर्यातक्षम केळीची काढणी सुरु होती. या केळीच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते त्याचेच अधिक प्रमाणाक नुकसान झाले आहे. पूर्ण क्षमतेने पोसलेली केळी आता मातीमोल झाली आहे. काढणी पूर्वी शेतकऱ्यांना चिंता होती ती दराची आता तर सर्वकाही मातीमोल झाल्याने नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
एकरी 2 लाख रुपयांची शेतकऱ्यांची मागणी
हंगाम सुरु होण्यापूर्वी घटत्या दराची चिंता उत्पादकांना सतावत होती. मात्र, केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले फळ असून आंब्यानंतर आता कुठे दरात सुधारणा होण्यास सुरवात झाली होती. मात्र, पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. आता पाहणी आणि पंचनामे याची औपचारिकता न करता सरकारने एकरी 2 लाखाची मदत करण्याची मागणी गिरगांव येथील बालाजी नादरे या शेतकऱ्याने केली आहे.गतवर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून सावरत असताना पुन्हा वादळी वारे मान्सूनपूर्व पावसाने घात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पीकविम्यावरचा भरवसाच उडाला
केळी उत्पादक शेतकरी पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी योजनेत सहभागी तर होतात मात्र, विमा कंपन्यांकडून केळी उत्पादकांना डावलले जाते. त्यामुळे यंदाच्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागच नोंदवला नाही. शिवाय पीकविम्याचे निकष हे बदलले असल्याने अनेक केळी उत्पादकांना विमाच भरला नाही. त्यामुळे सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट एकरी 2 लाखाची मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
खरिपासाठी पोषक
खरीप हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. आतापर्यंत खरीपपूर्व मशागतीची कामे झाले असून आता शेतजमिन सुपिक होण्यास मदत मिळणार आहे. सरासरीएवढा पाऊस झाला की शेतकरी हा चाढ्यावर मूठ ठेवण्यास तयार आहे. आशादायी वातावरणामुळे बियाणे-खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची वर्दळ सुरु झाली आहे.