Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. आवक वाढूनही दर स्थिर होते. यंदा खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारपेठेत दाखल झाला होता. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम नव्हता तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत यंदा विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिरच होते. मात्र, आता उन्हाळी हंगामातील कांद्याची एंन्ट्री बाजारपेठेत झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अधिकची वाढ झाल्याने शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 रुपयांनी दर घसरले.

Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 4:31 PM

लासलगाव : गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. आवक वाढूनही (Onion Rate) दर स्थिर होते. यंदा खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारपेठेत दाखल झाला होता. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम नव्हता तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत यंदा विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिरच होते. मात्र, आता (Summer Onion) उन्हाळी हंगामातील कांद्याची एंन्ट्री बाजारपेठेत झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अधिकची वाढ झाल्याने शनिवारच्या तुलनेत (Lasalgaon Market) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 रुपयांनी दर घसरले. त्यामुळे कांद्याला लहरीपणाचे पीक कशामुळे म्हणतात याचा प्रत्यय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आला. यावेळे कांद्याने ग्राहकांच्या नाहीतर शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणले आहे. देशांतर्गतच्या मुख्य बाजारपेठात लाल कांद्याची आवक वाढली आहे.तर नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाव वर झाला आहे.

कांद्याच्या दरात असा झाला बदल

शनिवारी 1 हजार 233 वाहनातून 17 हजार 826 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी 1 हजार 800 वाहनातून 32 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल 2077 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे.

लाल कांद्याच्या जोडीला आता उन्हाळी कांदा

आतापर्यंत खरीप हंगामातील लाल कांद्याचीच आवक होती. शिवाय सरासरीप्रमाणेच आवक असल्याने गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर हे टिकून होते. लासलगावच नाही तर सोलापूर, अहमदनगर येथील बाजारपेठेत आवक वाढूनही दर कायम होते. यंदा उन्हाळी कांद्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. शिवाय सध्याच दर हे टिकून असल्याने छाटणी झाली की लागलीच विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे लाल कांद्याची सरासरीएवढी आवक होत असताना त्यामध्ये आता उन्हाळी कांद्याची भर पडल्याने अचानक 550 रुपयांनी दर घसरले आहेत.

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम कांदा निर्यातीवर

आतापर्यंत द्राक्ष निर्यातीला तर युध्दाचा कुठे अडसर झालेला नाही. पण कांदा निर्यातीसाठी अडचण निर्माण होऊ शकते असा अंदाज सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला आहे. कंटनेरच्या माध्यमातून कांद्याची निर्यात होते. मात्र, आता युध्दजन्य परस्थिती निर्माण झाल्याने वाहनांना सहाजासहजी परवानगी दिली जात नाही. शिवाय कांद्याची वेळेत वाहतूक झाली नाही तर त्याची नासाडी होते. आतापर्यंत ही समस्या उद्भवली नव्हती पण आता आपल्याच रीस्कवर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे घटते दर आणि आता निर्यातीवरटे निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निर्यातीबाबतचे धोरण केंद्र सरकारने ठरवावे अशी मागणी सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

पश्चिम विदर्भात यंदाही पाणी टंचाईची शक्यता, धरणात उरलंय फक्त एवढंच पाणी…

पहिला मान उस्मानाबादला : शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतिक्षा संपली, आता थेट बॅंक खाते चेक करा..!

Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.