Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Water Day: जागतिक पाणी दिनानिमित्त जलशक्ती अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा होणार

जागतिक पाणी दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जलशक्ती अभियानाची घोषणा करतील. Jal Shakti Abhiyan World Water Day

World Water Day: जागतिक पाणी दिनानिमित्त जलशक्ती अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 5:33 PM

नवी दिल्ली: जागतिक पाणी दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जलशक्ती अभियानाची घोषणा केली जाणार आहे. जलशक्ती अभियानाची थीम ही कॅच द रेन असणार आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची घोषणा करतील. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्या करार होणार आहे. (Prime Minister Narendra Modi will  launch Jal Shakti Abhiyan on the occasion of World Water Day)

जलशक्ती अभियान

जलशक्ती अभियान हे जनआंदोलन व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे अभियान 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. यामाध्यमातून पावसाद्वारे पडलेले जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे देशातील शहरी आणि ग्रामीण भागात राबवले जाईल.

केन बेटवा नदीजोड प्रकल्प

केंद्र सरकारच्या वतीनं केंट बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या कराराला मान्यता देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेनुसार काम करण्यात असल्याचं सांगितलं. ज्यादा पाऊस असलेल्या क्षेत्रातून दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हा नदी जोड प्रकल्पाचा उद्देश होता.

10 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

बेटवा आणि केन या नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांतर्गत डौधान धरण आणि कॅनलची निर्मिती करण्यात येईल. याप्रकल्पाअंतर्गत लोअर ओर प्रोजेक्ट, कोठा बॅरेज, बिना कॉम्प्लेक्स यासह विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल. केन बेटवा यांना जोडलं गेल्यानं दरवर्षी 10.62 लाख हेक्टरवरील क्षेत्र ओलिताखाली येईल. याप्रकल्पाचा फायदा 62 लाख लोकांना होणार आहे. तर या प्रकल्पाद्वारे 103 मेगावॅट वीज जलविद्युत प्रकल्पाद्वारे तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

प्रकल्पाचा फायदा कोणत्या भागांना होणार?

केन बेटवा नदी जोड प्रकल्पाचा फायदा बुंदेलखंड, पन्ना , टिकमगढ, छत्तरपूर, सागर, दामोह, दातिया, विदीषा, शिवपूर या मध्यप्रदेशातील तर उत्तर प्रदेशातील बंड, महोबा, झांसी आणि ललितपूर या भागांना होणार आहे.

संबंधित बातम्या:

मोदींनी आणलेल्या कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे, विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : देवेंद्र फडणवीस

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर देशाच्या सामर्थ्याची झलक, वांद्र्यात आदित्य ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण

(Prime Minister Narendra Modi will launch Jal Shakti Abhiyan on the occasion of World Water Day)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.