शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे. आता नव्याने पिकाचे 35 प्रकार हे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे मंगळवारी सांगितले. यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना 'कानमंत्र'
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 2:44 PM

मुंबई : शेतकऱ्यांच्या हीतासाठी हे सरकार काम करीत आहे. अगदी तळागळातील शेतकऱ्याला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने केला जात आहे. त्या अनुशंगाने सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी मध्यस्थी राहणार नसल्याचे (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे. आता नव्याने पिकाचे 35 प्रकार हे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे मंगळवारी सांगितले. यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक वेगळी भेट असून सर्वसामान्य शेतकऱ्यालाही याचा फायदा होणार आहे.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात 35 वेगवेगळी पिके राहणार आहेत. यामध्ये कुटू, गहू, भात, तूरदाळ, सोयाबीन, मोहरी, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा यांचा समावेश आहे. रायपूर येथील एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांची तर माहीती दिलीच शिवाय शेतामध्ये नव नविन प्रयोग राबवणाऱ्या शेतकऱ्यांशी संवादही साधला. सरकारने शेतकऱ्यांना सुधारित बियाणे उपलब्ध करून दिले आहे. याचा फायदा उत्पादन वाढीसाठी नक्कीच होणार आहे.

मृदा आरोग्य कार्ड, खताची उपलब्धता, एमएसपीमध्ये विक्रमी खरेदी या माध्यमातून होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR)वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत. बाजारात असलेल्या थेट शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न या संस्थेने केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी प्रगत शेती करण्याचे वेगवेगळे पर्याय तर सांगितलेच शिवाय पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM KISAN) यांच्याविषयी माहिती दिली.

जैविक तणावावर धोरणात्मक संशोधन करण्यासाठी आणि मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी रायपूर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल स्ट्रेस मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेने शैक्षणिक सत्र 2020 – 21 पासून नविन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या दरम्यान मोदी यांनी उत्तराखंडमधील एका शेतकऱ्याशी संवाद ही साधला. “तुम्ही स्वीकारलेल्या शेतीच्या नवीन पद्धतीचा काय फायदा?” अशा प्रकारची विचारणा त्यांनी केली तर शेतकऱ्यानेही उत्तर दिले की, शेतामध्ये त्याने या आधुनिक पध्दतीने मका लागवड करण्यास सुरवात केली आहे.

शेती आणि विज्ञान यांच्यातील समन्वय

शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. शेती नेहमीच विज्ञानाशी निगडीत राहिलेली आहे. शेती आणि विज्ञान यांच्यात समन्वय आहे. बियाण्यांच्या नवीन जाती हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आहेत. राष्ट्रीय बायोटिक्स स्ट्रेस मॅनेजमेंट हवामान बदलाच्या पिकांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करेल आणि त्या समस्येचा सामना करण्यास मदतही करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी  सिंचन योजना

शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या 100 सिंचन प्रकल्पांवर काम करून त्यांना लागवडीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मृदा आरोग्य कार्डांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढहोण्यास मदत झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

11 कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप

मृदा आरोग्य कार्डचा शेतकऱ्यांना फायदा झाला. 11 दशलक्ष मृदा आरोग्य कार्ड दिली.

दीड लाख कोंटीचे वितरण

पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान किसान निधीच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय 2 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (किसान क्रेडिट कार्ड) देण्यात आले आहे.  (Prime Minister Narendra Modi’s message to farmers for production growth, guidance on 35 new crops)

संबंधित बातम्या :

सोलापूर : शेंगासह सोयाबीन पाण्यात, सांगा शेती करायची कशी?

कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज

…अखेर त्या 44 साखर कारखान्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांनो आता ‘ही’ यादी पाहूनच ऊस घाला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.