खरेदी केंद्रावर खरचं मिळेल का शेतकऱ्याला ‘आधार’ ? समजून घ्या पीक विक्रीची पध्दत

आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शासनाने सुरु केलेली गडबड काय कामाची असा सवालच शेतकरी विचारत आहेत. मूग वगळता या हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडदाचे दर कमी असल्याने शेतकरी केंद्रावर फिरकणार का नाही हा देखील प्रश्न आहे. असे असले तरी हमीभाव केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी काय कागदपत्रांची आवश्यकता असते शिवाय कशी होते मालाची खरेदी हे आपण पाहणार आहोत.

खरेदी केंद्रावर खरचं मिळेल का शेतकऱ्याला 'आधार' ? समजून घ्या पीक विक्रीची पध्दत
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:19 PM

आंबाजोगाई: खरीप हंगामाच्या (Kharif Season) अंतिम टप्प्यात का होईना नाफेड संस्थेमार्फत शासनाने (base price) आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली नसली तरी नोंदणी प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे (Guarantee Procurement Centre, ) खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शासनाने सुरु केलेली गडबड काय कामाची असा सवालच शेतकरी विचारत आहेत. मूग वगळता या हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडदाचे दर कमी असल्याने शेतकरी केंद्रावर फिरकणार का नाही हा देखील प्रश्न आहे. असे असले तरी हमीभाव केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी काय कागदपत्रांची आवश्यकता असते शिवाय कशी होते मालाची खरेदी हे आपण पाहणार आहोत.

शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून नाफेडच्यावतीने दरवर्षी ही खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु केली जातात. यंदा मात्र, खरीप हंगामातील पिकांची विक्री झाल्यानंतर ही खरेदी केंद्र सुरु होत आहेत. त्यामुळे शेतीमाल घेऊन जाताना शेतकऱ्यांबरोबर कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणार आहोत.

नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे

1. ऑनलाईन पिकपेरा असलेला 7/12 उतारा, 8-अ मूळ प्रत चालू वर्षाची 2. आधार कार्डाची झेरॅाक्स 3. राष्ट्रीयकृत बँकतील खात्याच्या पासबुकची झेरॅाक्स पण ते ही हस्तलिखित नसायला हवे. 4. मोबाईल नंबर

कोणत्या पिकांची होणार खरेदी ?

खरीप हंगामात दरवर्षी ही आधारभूत खरेदी केंद्र सुरु होत असतात. बाजारभावात दर कोसळले तर किमान दर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळावा हा यामागचा उद्देश आहे. मात्र, यंदा सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा बाजारात सोयाबीन आणि उडदाला दर आहे. त्यामुळे शेतकरी या मालाची विक्री ही बाजारपेठेतच करीत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी ही खरेदी केंद्रावर सुरु आहे. याकिरता आवश्यक ती कागदपत्रे मागवली जात आहेत. या खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील सोयाबीन, उदीद आणि मुगाची खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोंदणीच्या प्रक्रीयेनंतर काय ?

15 ऑक्टोंबरपासून शेतीमाल खरेदीसाठी नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. याकरिता वेगवेगळ्या संस्थांकडे हे काम नाफेडने दिलेले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कागदपत्रांची माहिती ऑनलाईनद्वारे नाफेडला कळविण्यात येणार आहे. त्यांच्या परवानगीनंतर एका केंद्रावर किती क्विंटल मालाची खरेदी करायची याबाबत या संस्थांना सुचना येणार आहेत. त्यानुसार खरेदी केली जाणार आहे. सध्या केवळ शेतकऱ्यांची नोंदणी सुरु असल्याचे अबाजोगाई संस्थचे माधवराव पाटील यांनी सांगितले आहे.

हंगाम २०२१-२२ करिता आधारभूत किंमत खालील प्रमाणे आहेत :

मूग –         ७,२७५ प्रती क्विंटल उडीद –     ६,३०० प्रती क्विंटल सोयाबीन    ३,९५० प्रती क्विंटल

सर्व प्रकारची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार.

शेतकरी बांधवांनी FAQ दर्जाचा म्हणजेच काडी कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल आणावा, १२% पेक्षा जास्त आर्द्रता नसावी. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी झाल्यानंतरच वजनासह काटा पट्टी देण्यात येईल. नोंदणी करण्याचा प्रारंभिक कालावधी 15 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. (Procurement centre, registration begins to provide basic price to farmers’ agricultural produce)

संबंधित बातम्या :

नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीचा ‘ठसका’ ; तीन दिवसांमध्ये 15 हजार क्विंटलची आवक

रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा..!

महिला शेतकरी गट होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.