Positive News: तीन महिन्यात 150 लाख टन साखरेचे उत्पादन, महाराष्ट्राचा किती वाटा ? वाचा सविस्तर
गेल्या तीन महिन्याच्यान कालावधीत गाळपातून देशात 150 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यामध्ये 10 लाखाने वाढ झाली आहे. तर आतापर्यंत 17 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. या सबंध साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.
पुणे : राज्यातील (Sugar Factory) साखर कारखान्यांचे गाळप सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. या दरम्यानच्या काळात इतर पिकांचे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले असले तरी ऊस उत्पादकांना गाळपातून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्याच्यान कालावधीत गाळपातून देशात 150 लाख टन (Sugar Production) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यामध्ये 10 लाखाने वाढ झाली आहे. तर आतापर्यंत 17 लाख टन (Sugar Export) साखरेची निर्यात झाली आहे. या सबंध साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. कारण एकूण साखरेच्या उत्पादनापैकी 58 लाख टन साखरेचे उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून झालेले आहे. त्यामुळे रेशीम उद्योग आणि दुसरीकडे साखर उद्योगामध्ये देशात महाराष्ट्राची सरशी आहे.
महिन्याभरापासून निर्यातीचे करार मंदावले
गाळप हंगाम सुरु झाले की पहिल्या दोन महिन्यांमध्येच साखर निर्यातीचे झालेले करार साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या करारामुळेच आतापर्यंत 17 लाख टन साखर ही निर्यात झाली आहे. तर जानेवारीपर्यंत 7 लाख टन साखर निर्यात होईल असे सांगण्यात आले आहे. यंदा साखर उद्योगासाठी सर्वकाही पोषक आहे. कारण गतवर्षीच्या तुलनेत 4 लाख टन साखर अधिकची निर्यात झाली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झाल्याने करारही मंदावले आहेत. मात्र, हीच परस्थिती भविष्यात दर वाढतील अन् यंदा देशभरातून विक्रमी निर्यात होणार आहे.
या दोन राज्याचा मोठा वाटा
साखर उत्पादनात सुरवातीपासूनच महाराष्ट्राचा मोठा आहे. यंदा देशात साखरेचे उत्पादन हे 150 लाख टनावर झालेले असले तरी यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. एकट्या महाराष्ट्रातून आतापर्यंत 58 लाख टन साखरेचे उत्पन्न झाले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातून 40 लाख म्हणजे एकूण उत्पादनाच्या निम्मे उत्पादन हे केवळ या दोन राज्यांमधून झालेले आहे.
यामुळे वाढतोय ऊस तोडणीचा वेग
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून ऊसतोडणी होत आहे. आता हंगाम मध्यावर असताना अवकाळी पावसामुले मध्यंतरी ऊस तोडणीची कामे खोळंबली होती. 15 दिवस ना यंत्राने तोड होत होती ना मजूराने. आता वातावरण निवळले असून तोडणी कामे वेगात सुरु आहेत. शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऊसतोडणीचे कामे उरतून घेण्यावर साखर कारखान्यांचा भर आहे. मजूरांबरोबर आता यंत्राच्या माध्यमातून तोडणी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
Rabi Season : वातावरण निवळले, शेतकऱ्यांनो लागा कामाला, पीक संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
राज्यात रेशीम कोषचे विक्रमी उत्पादन अन् दर्जाही सर्वोत्तम, कशामुळे बदलले चित्र? वाचा सविस्तर
Summer Season: ज्वारीचे क्षेत्र घटले तरी चाऱ्याची चिंता कशाला? शेतकऱ्यांनी शोधला हा पर्याय..!