Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन
यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये जिथे सोयाबीन शेताबाहेर काढण्याचे मुश्किल झाले होते तिथे 15 हेक्टरात 340 क्विंटलचा उतारा हे काल्पनिक वाटत असलं तरी सत्य आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी जे बीज गुणन केंद्र उभारण्यात आली आहेत त्याच केंद्राने ही किमया घडवून आणलेली आहे. अंबाजोगाई तालुका बाीज गुणन यंदा खरिपावर संकट असतानाही 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेऊन दाखविले आहे.
लातूर : यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये जिथे सोयाबीन शेताबाहेर काढण्याचे मुश्किल झाले होते तिथे 15 हेक्टरात 340 क्विंटलचा उतारा हे काल्पनिक वाटत असलं तरी सत्य आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी जे बीज गुणन केंद्र उभारण्यात आली आहेत त्याच केंद्राने ही किमया घडवून आणलेली आहे. अंबाजोगाई तालुका बाीज गुणन यंदा खरिपावर संकट (Soybean Record Production) असतानाही 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. या करिता (Maus-162) या वाणाचे बीज उत्पादन त्यांनी घेतले आहे.
बीजोत्पादनाचा प्रश्न मिटला
आगामी हंगामात बियाणाचा तुटवडा भासू नये म्हणून महाबिजने बिजोत्पदनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याबाबत जनजागृतीही केली जात आहे. पण अंबाजोगाई बीज गुणन केंद्राने जे विक्रमी उत्पादन घेतले आहे ते अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कारण गेल्या 50 वर्षात अशाप्रकारे उत्पादन घेतलेल्याची नोंदही परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही नाही. योग्य नियोजन आणि पीक पध्दतीमध्ये बदल करुन या बीजगुण केंद्राने ही किमया केली आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दीष्ट्याच्या 200 टक्के पेक्षा अधिक उत्पादन घेण्यात आले आहे.
विद्यापीठाचा अंदाजही चुकीचा ठरला
प्रतिहेक्टर 10 क्विंटलप्रमाणे 15 हेक्टरावर 150 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. पण टोकम पध्दतीने लागवड, योग्य देखभाल घेतल्याने अतिवृष्टीचा देखील यावर काही परिणाम झाला नाही. अतिवृष्टीवर मात करीत 15 हेक्टरमध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन या गुणन केंद्राने घेऊन दाखवले आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे विक्रमी उत्पादन हे मराठवाडा विद्यापीठात कुणीही घेतलेले नव्हते. मात्र, याकरिता कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट वरीष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे राहिले असल्याचे बीज गुणन केंद्राचे डॅा. गोविंद मुंडे यांनी सांगितले आहे.
बीजोत्पादन करताना काय काळजी घ्यावी लागते?
हंगामापूर्वी केले जाणारे बीजोत्पादनावरच त्या हंगामातील उत्पादनक्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे योग्य काळजी घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वाणाची वाणाची उत्पादन क्षमता ही त्याच्या अनुवंशिक गुणधर्मावर आधारीत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानिपढ्या टिकून ठेवायची असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये हे सर्वात महत्वाचे आहे. बियाणामध्ये भेसळ ही पेरणी, काढणी, मळणी व पिशवीत भरण्यापूर्वी कधीही होऊ शकते. त्यामुळे 100 टक्के भेसळ टाळून बीजोत्पादन करणे महत्वाचे आहे.
पेरणी करताना घ्यावयाची काळजी
पेरणीसाठी बियाणांची पिशवी उलट्या बाजूने फोडावी, पिशवीवरील खूण, चिट्ठी याच्यासह बियाणाचा नमुना जपून ठेवावा. ज्यामुळे बियाणे सदोष आढळल्यास जपून ठेवलेले बियाणे नमुन्यांची उगवण क्षमता चाचणी घेणे शक्य होणार आहे. बीजप्रक्रिया झाल्यानंतर बियाणे बीज परीक्षणात पास झाल्यावर ते योग्य आकाराच्या पिशव्यात भरुन त्यास बीजप्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र लावले जाते. असेच बियाणेच पेरणीसाठी वापरल्यास उत्पादनात वाढ होते.