औषधी वनस्पतींची शेती, हजारोंची गुंतवणूक अन् लाखोंची कमाई

आता शेती करारावर देऊन कंपन्यांनी ठरवून दिलेले उत्पादन घेऊन पैसा कमावता येतो. (medicinal plants) आपण ज्या शेती व्यवसयाबद्दल सांगत आहोत ती औषधी वनस्पती लागवड. काळाच्या ओघात व्यवसयाचे चित्र हे झपाट्याने बदलत आहे. नैसर्गिक उत्पादने आणि औषधांची बाजारपेठत वाढती मागणी यामुळे या व्यवसायाला महत्व प्राप्त होत आहे.

औषधी वनस्पतींची शेती, हजारोंची गुंतवणूक अन् लाखोंची कमाई
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 10:59 AM

मुंबई :  शेती म्हणले (Farming) की आपल्यासमोर चित्र उभा राहते ते, खरीप, रब्बी हंगाम आणि फळबागा…मात्र आता यापुढे जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (herbs) नैसर्गिक वनस्पतींचा वापर करुन अनेक आयुर्वेदिक औषधे ही तयार केली जातात. (natural plant) नैसर्गिक वनस्पतींचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या औषधांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींची लागवड हा शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय आहे. या शेतीने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार आहे.

अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतीची शेती करण्याची संधी देत आहेत. कमी खर्चात ही शेती सुरु होते असे नाही तर यातून दीर्घकालीन कमाई देखील निश्चित आहे. याकरिता क्षेत्रही कमी लागते आणि गुंतवणूकही कमी होते. औषधी वनस्पतीचे लहान-लहान मळे केले जातात. याकरिता केवळ 15 हजार रुपयांचा खर्च येतो तर उत्पादन हे लाखोंमध्ये होते. चला तर मग पाहू की अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यातून लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

औषधांना बारमाही मागणी असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वनस्पतीची लागवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे. कमी खर्चात ही शेती सुरु होते असे नाही तर यातून दीर्घकालीन कमाई देखील निश्चित आहे. याकरिता क्षेत्रही कमी लागते आणि गुंतवणूकही कमी होते. औषधी वनस्पतीचे लहान-लहान मळे केले जातात. याकरिता केवळ 15 हजार रुपयांचा खर्च येतो तर उत्पादन हे लाखोंमध्ये होते. चला तर मग पाहू की अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यातून लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

जागा कमी उत्पादन अधिक

औषधी वनस्पतीमध्ये तुळशी, तुळशी, आर्टेमिसिया, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी बहुतेक हर्बल वनस्पती अगदी कमी वेळात तयार होतात. याकरिता शेतीच असावी असे काही नाही तर लहान कुंडामध्येही या वनस्पती वाढतात. या वनस्पतींची लागवड सुरू करण्यासाठी केवळ काही हजार रुपये खर्च खर्च होणार आहेत. पण उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. आजकाल देशात अनेक औषध कंपन्या आहेत ज्या पिके खरेदी करेपर्यंत करार करतात. त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा धोका होत नाही. त्याची कमाई ही ठरवलेलीच असते.

3 महिन्यांमध्ये लाखांमध्ये 3 लाखांची कमाई

तुळस ही धार्मिक बाबींशी जोडलेली असते परंतु औषधी गुणधर्म यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच तुळशीला वेगळे असे महत्व आहे. युजेनॉल आणि मिथायलंड सिनामेटला कारणीभूत असलेल्या तुळशीचे अनेक प्रकार आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी औषधे तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. 1 हेक्टरवर तुळशी पिकवण्यासाठी केवळ 15 हजार रुपये खर्च येतो. योग्य जोपासना आणि करारानुसार विक्री झाली तर या 1 हेक्टरातून 3 लाखापर्यंतचे उत्पादन मिळणार आहे.

येथे आहे मार्केट

पतंजली, डाबर, वैद्यनाथ इत्यादी आयुर्वेद औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही तुळशीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. थेट शेतीशी करार करुन विक्री करतात. तुळशीच्या बिया आणि तेलाची बाजारपेठ मोठी आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तेल आणि तुळशीचे बियाणे दररोज नवीन दराने विकले जातात.

प्रशिक्षणामुळे अधिक सुलभ

औषधी वनस्पतीलागवडीसाठी चांगले प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यावरच भवितव्य ठरणार आहे. यातून फसवणूक होऊ नये याची काळजी महत्वाची आहे. लखनौस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स (CMAP) या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण देते. सीएमएपीच्या माध्यमातूनच औषध कंपन्याही तुमच्याशी संपर्क साधतात. त्यामुळे मार्केट शोधत फिरण्याची आवश्यकताही नाही. (Production of more by investing less in medicinal plants farming)

 संबंधित बातम्या :

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन

हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार

दुष्काळात तेरावा ! कांदा चाळीतील 90 टन कांदा सडला, काय आहे उपापयोजना ?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.