हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस संबंध राज्यात झाला आहे. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे सर्व प्रकल्प तुडूंब भरुन वाहत आहेत. सर्वकाही असतानाही रब्बी हंगामातील हरभरा या पिकाला वेळेत पाणी मिळाले नाही तर एक चूक शेतकऱ्यांना खूप महागात पडणार आहे. पीक पाण्याला येऊनही वेळेत पाणी दिले नाही तरी हरभरा पिकामध्ये तब्बल 30 टक्के घट होऊ शकते.
अकोला : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस संबंध राज्यात झाला आहे. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे सर्व प्रकल्प तुडूंब भरुन वाहत आहेत. सर्वकाही असतानाही (Rabi Season) रब्बी हंगामातील ( Gram Crop) हरभरा या पिकाला वेळेत पाणी मिळाले नाही तर एक चूक शेतकऱ्यांना खूप महागात पडणार आहे. पीक पाण्याला येऊनही वेळेत पाणी दिले नाही तरी हरभरा पिकामध्ये तब्बल 30 टक्के घट होऊ शकते. याचा शेतकरी कधी विचार करीत नाही मात्र, हरभरा काढणी झाल्यावर ही बाब लक्षात येते. तेव्हा मात्र, वेळ निघून गेलेली असल्याचे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॅा. विनोद खडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पेरणी झाल्यापासून पीक काढणीपर्यंत योग्य ते नियोजन गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
असे करा पाण्याचे नियोजन
हरभरा पिकाला जास्त प्रमाणात पाणी दिले तर पीक उभाळण्याचा धोका असतो. स्थानिक परस्थितीनुसार आणि जमिनीच्या दर्जानुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे लागणार आहे. जमिनीस भेगा पडेपर्यंत ताण देऊ नये. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेमी पाण्याची आवश्यता असते. त्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल असे नियोजन करणे गरजेचे आहे. जिरायती क्षेत्रावर जेव्हा हरभरा पिकाला फुले लागतात त्याच दरम्यानच्या काळात पाणी दिले अधिकचा फायदा होणार आहे. तर चांगल्या जमिनी क्षेत्राकरिता दोन वेळेसच पाणी दिले तरी उत्पादनात वाढ होणार आहे.
असे घडते उत्पादन प्रक्रिया
हरभरा पिकाला एकवेळेस पाणी दिले तर 30 टक्के, दोन वेळेस पाणी दिले तर 60 टक्के तर तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होत असल्याचे डॅा. खडसे यांनी सांगितले आहे. घाटीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे ते ही प्रति एकरी 8 लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दो ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे.
उत्पादनात घट झाली तरी अपेक्षित दर मिळाला
वातावरणातील बदलामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. जवळपास 40 टक्के उत्पादनावर परिणाम झालेला आहे. दरवर्षी एकरी 12 ते 14 क्विंटलचे उत्पादन मिळत असते. पण यंदा घटलेल्या उत्पादनाची कसर ही वाढीव दराने भरुन काढलेली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर सध्या तरी मिळत आहे. शिवाय उद्या जानेवारी मध्ये नवीन हळदीचे दर काय राहणार यावरही बरेच अवलंबून आहे. पण हळदीचा दर्जा खालावल्याने काय परिणाम होतोय हे पहावे लागणार आहे.