Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी

मराठवाड्यात पाणीटंचाई ही तशी ठरलेलीच आहे. पण गेल्या दोन वर्षापासून चित्र बदलत आहे. (Marathwada) गतवर्षीही हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्याने पाणी टंचाईचे संकट हे दूर झाले होते. यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने मराठवाड्यातील आठही प्रमुख प्रकल्प हे भरलेले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला असून यंदा शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी पुरेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी
मांजरा धरणाचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 12:19 PM

लातूर : (Latur) मराठवाड्यात पाणीटंचाई ही तशी ठरलेलीच आहे. पण गेल्या दोन वर्षापासून चित्र बदलत आहे. (Marathwada) गतवर्षीही हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्याने पाणी टंचाईचे संकट हे दूर झाले होते. यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने मराठवाड्यातील आठही प्रमुख प्रकल्प हे भरलेले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला असून यंदा शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी पुरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. मराठवाड्यातील शेतीच्या दृष्टीने मांजरा, माजलगाव, जायकवाडी निम्न तेरणा हे महत्वाचे प्रकल्प आहेत. सर्वच प्रकल्पात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होत आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पावसाची मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपातली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे मराठवाड्यातील प्रमुख आठ प्रकल्प ही पूर्णक्षमतेने भरलेली आहेत. जायकवाडी प्रकल्पात 72 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे औरंगाबादसह इतर लगतच्या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली तर आहेच शिवाय शेतीसाठीही यंदा पाणी मिळणार आहे.

जायकवाडी बरोबर बीड जिल्ह्यातील माजलगाव, उस्मानाबाद, लातूर आणि बीडच्या सीमेवर असलेले मांजरा या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. जायकवाडी प्रकल्पात 6369 क्युसेसने पाण्याची आवक ही सुरु आहे. पाण्याची आवक सुरु असल्याने उपयुक्त पाणीसाठा हा 68.38 टक्के झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा हा 98.46 टक्यावर आहे. यामधून 1997 क्युसेसने पाण्याचा विसर्ग हा सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील येलदरी प्रकल्प, सिध्देश्वर प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत तर इसापूर प्रकल्प हा 99 टक्के भरलेला आहे.

गतवर्षी उद्योग क्षेत्राला लागले होता ब्रेक

अनियमित पावसाचा परिणाम येथील शेती क्षेत्रवरच नाही तर उद्योग व्यवसयांवरही होता. दोन वर्षापुर्वी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे लातुरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. मांजरा धरणातील पाणी हे केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते. परिणामी येथील उद्योगांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने काही काळ उद्योग व्यवसायाला ब्रेक लागले होते.

रब्बीतील पिकांनाही मुबलक पाणी

पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असते तरी रब्बी हंगामात ऐन गरजेच्या प्रसंगी पाणी मिळणार आहे. शिवाय मांजरा नदीकाठचा परिसर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. यंदा या शेती क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे.

ऊसाचे क्षेत्रही वाढणार

शेती सिंचनासाठीच मांजरा धरणाची उभारणी ही झाली होती. मात्र, काळाच्या ओघात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. प्रसंगी टॅंकरनेही पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ही ओढावलेली होती. त्यामुळे आगोदर या धरणातील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवले जात होते. परिणामी शेतीसाठी पाणी हे मिळत नाही. यंदा मात्र, समाधनकारक पाऊस झाला आहे. शिवाय या धरणालगतचा भाग हा ऊसाचा ग्रीनबेल्ट म्हणून ओळखला जातो. यंदा पुरेसा पाणीसाठा असल्याने शेतीसाठीही पाणी पुरवले जाणार परिणामी ऊसाचे क्षेत्र वाढणार हे नक्की (Projects in Marathwada to get water stock, agriculture water)

संबंधित बातम्या :

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

आधी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल घेऊन द्या, नंतरच ‘ई पीक पाहणी’ ची अंमलबजावणी करा, शेतकऱ्याची आग्रही मागणी

‘एफआरपी’ चा साखर कारखानदारांना विसर, राज्यातील कारखान्यांकडे कोट्यावधीची थकबाकी

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.