AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या डोळ्यादेखत मुलाच्या अंगावर वीज पडली, घाबरलेल्या आईनं हबरडा फोडला, शेवटी गावकऱ्यांनी…

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. शेतातील उभ्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

आईच्या डोळ्यादेखत मुलाच्या अंगावर वीज पडली, घाबरलेल्या आईनं हबरडा फोडला, शेवटी गावकऱ्यांनी...
UNSEASONAL RAIN Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 11:40 AM

पुणे : पुणे (PUNE) जिल्ह्यातील भोर (BHOR) तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसादरम्यान (UNSEASONAL RAIN), नाझरे गावात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हनुमंत बाळासो चव्हाण असं मृत्यू झालेल्या 35 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. शेतातील काम करुन घरी परतत असताना अंगावर वीज पडलीय. आईच्या डोळ्यासमोरच मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. हनुमंत याच्या अकाली जाण्याने नाझरे गावावर शोककळा पसरली आहे. काल प्रकार झाल्यापासून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भयभीत झाला आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आभाळ दाटून आलं होतं. त्यावेळी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे हनुमंत बाळासो चव्हाण हे त्यांच्या आईसोबत शेतात होते. विजांचा कडकडाट सुरु असल्यामुळे ते घरी निघाले होते. त्यावेळी वाटेतचं हनुमंत बाळासो चव्हाण यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये त्यांचा जागीचं मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आंबवडे खोऱ्यातील नाझरे गावात ही घटना घडली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. शेतातील उभ्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून हैराण झालेल्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला तर गारांसह पडलेल्या पावसाने अनेकांनी गारा खाण्याचा आनंद घेतला आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, गावडेवाडी, टाव्हरेवाडी परिसरात अवकाळी पावसामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांनी मेणबत्तीचा आधार घेतला. कांदा आणि भूईमूग या दोन्ही पिकाचं मोठ नुकसान झालं आहे.

हे सुद्धा वाचा
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.