हाडाच्या शेतकऱ्याचं बैलावर जीवापाड प्रेम, बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रियाविधी, बैलाचा पुतळाही उभारला!
पुण्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील शेतकरी शंकर पाटोळे यांच्याकडील लाडक्या बैलाचा मृत्यू झाला होता. बैलाच्या मृत्यूननंतर शंकर पाटोळे यांनी दशक्रियाविधी घातला.
पुणे: शेतकऱ्याच्या जीवनात आणि भावविस्वात बैलजोडीला महत्वाचं स्थान असतं. शेतकऱ्याचं भावविश्व मुक्या प्राण्यांशी जोडलेलं असतं. शेतकरी त्याच्या घरातील पाळीव प्राण्यांवर किती प्रेम करतो, हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील शेतकरी शंकर पाटोळे यांच्याकडील लाडक्या बैलाचा मृत्यू झाला होता. बैलाच्या मृत्यूननंतर शंकर पाटोळे यांनी दशक्रियाविधी घातला. इतकंच नव्हेत तर बैलाची आठवण कायम राहावी यासाठी घरासमोर बैलाचा पुतळाही उभारला आहे. शंकर पाटोळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बैलाविषयीच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होता आहे. (Pune Khed Vadgaon Patole Farmer Shankar Patole build the statue of bull)
दशक्रिया विधी केला अनं पुतळाही उभारला
बळीराजा शेतकरी आपल्या लाडक्या बैलाचे पोटच्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळ करतो,एवढेच नाही तर बैलाच्या मृत्यूनंतरही शेतकरी या बैलांचा दशक्रियाविधी घालतो आणि असाच काहीसा प्रकार खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावात घडला असून शंकर पाटोळे या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यूनंतर दशक्रियाविधी घालत बैलाची आठवण कायम राहावी यासाठी घरासमोर बैलाचा पुतळाही उभारला आहे.
28 वर्षांपासून कुटुंबाचा भाग
पाटोळे यांच्या घरच्याच गाईला 28 वर्षांपूर्वी गोर्हा झाला होता,या गोर्हांचे नाव त्यांनी शेलार असे ठेवले. हा गोर्हा त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य झाला होता. परंतु, पंधरा दिवसांपूर्वी या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर पाटोळे कुटुंबीयांना खूप दुःख झालं. पाटोळे कुटुंबीयांनी एकत्र येत आपल्या बैलाची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांनी आपल्या घरासमोर लाडक्या शेलार या बैलाचा पुतळा उभारला आहे.
पाटोळे कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे बळीराजा शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजा वरती किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शंकर पाटोळे यांनी त्यांच्या घरा समोरचं चौथरा उभारुन त्यावर बैलाचा पुतळा उभारला आहे.
Pune सुपरफास्ट : पुणे जिल्ह्यातील पाच बातम्या एकाच क्लिकवर https://t.co/cxd1TEPLsL #Pune | #PuneNews | #LatestNews | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
इतर बातम्या:
PM Fasal Bima Yojana: KCC कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा नुकसानाची शक्यता
तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्या
(Pune Khed Vadgaon Patole Farmer Shankar Patole build the statue of bull)