धक्कादायक, कांद्यावर यूरिया फेकत 450 पिशव्यांचं नुकसान; शेतकऱ्याचं साडे तीन लाखांचं नुकसान

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनं साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान करण्यात आलंय. शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठी यूरियाचा वापर करण्यात आलाय.

धक्कादायक, कांद्यावर यूरिया फेकत 450 पिशव्यांचं नुकसान; शेतकऱ्याचं साडे तीन लाखांचं नुकसान
कांद्याचं नुकसान
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 1:42 PM

पुणे: जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनं साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान करण्यात आलंय. शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठी यूरियाचा वापर करण्यात आलाय. कांद्यावर यूरिया टाकल्यानं शेतकऱ्याचं तब्बल साडेतीन लाखांचं नुकसान झालयं. नुकसान झालेला शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. चांगला दर मिळाल्यावर कांदा विकायचा यासाठी शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवलेला. मात्र, शेतकऱ्याच्या स्वप्नावर या घटनेमुळं पाणी फेरलं आहे.

450 पिशवी कांद्याचं नुकसान

आंबेगाव तालुक्यातील वळतीच्या गांजवेवाडी येथील शेतकरी दत्तू चेके यांच्या कांद्याच्या बराखीवर अज्ञात व्यक्तीने यूरियाचा वापर करून अंदाजे 450 पिशवी कांद्याचे नुकसान केले. दत्तू चेके या शेतकऱ्याचे यामध्ये सुमारे साडे तीन लाखांचं नुकसान झाले आहे.

दुर्गंधी येऊ लागल्यानं पाहिल्यानं प्रकार उघडकीस

दत्तू चेके सडलेल्या कांद्याची दुर्गंधी येऊ लागल्याने कांदा बराखीची पाहणी केली. संबंधित शेतकऱ्याने पाहणी केली असता कांद्यावर युरिया आढळून आला आहे. शेतकऱ्याला कांदा पिकापासून नफा मिळतो म्हणून शेतकरी कांदा साठवणूक करत असतो. मात्र, आता नुकसान पाहता शेतकरी चेके हे आर्थिक संकटात सापडले आहेत.

राज्यात आज सर्वदूर पावसाची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतोय. काल (शनिवारी) दिवसभर आणि रात्री मुंबईत जोरदार पाऊस बरसला. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत काळ्या ढगांनी दाटी केली आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व विभागात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाची बॅटिंग

काही दिवसांच्या विश्रांती नंतर मुंबईमध्ये एकदा परत रिमझिम पावसाची सुरुवात झाला असून अनेक ठिकाणी बोरिवली, गोरेगाव मालाड, दादर सायन कुर्ला आणि मुंबई सेंट्रल परिसरातील रिमझिम पाऊस

इतर बातम्या

Weather Alert today : मुंबईत जोरदार तर अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार, कुठे कुठे पाऊस पडणार?

Weather Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नेमका पाऊस कुठं पडणार?

Pune unknown person throw urea on onion due to farmer loss three lakh fifty thousand rupees

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.