जनावरांची ऑनलाईल खरेदी-विक्री, शेतकऱ्याला लाखोंचा गंडा ; अशी घ्या काळजी

अमरावती येथे एका शेतकऱ्याला गाईच्या खरेदीमधून तब्बल 97 हजारांचा गंडा बसलेला आहे. राजस्थान येथील एका तोतयाने त्याची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी दोन गाईंचा व्यवहार हा झाल्याने शेतकऱ्याचाही विश्वास बसला आणि ऐन तिसऱ्या वेळी मात्र, तोतयाने अमरावती राजेंद्र गुप्ता यांची फसवणूक केली. त्यामुळे ऑनलाईन खरेदी- विक्री करताना शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

जनावरांची ऑनलाईल खरेदी-विक्री, शेतकऱ्याला लाखोंचा गंडा ; अशी घ्या काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 12:27 PM

अमरावती : ऑनलाईनचा (Online) जमाना आहे. यामध्ये शेतकरी तरी कसा मागे राहील. त्यामुळेच आता जनावरांची देखील ऑनलाईद्वारे खरेदी-विक्री सुरु झाली आहे. एवढेच नाही तर तशा वेबसाईटही आता तयार करण्यात आल्या आहेत. () मात्र, हे सर्वकाही सुरक्षितच आहे असे नाही.  (Farmer’s Fraud) कारण (Amarawati) अमरावती येथे एका शेतकऱ्याला गाईच्या खरेदीमधून तब्बल 97 हजारांचा गंडा बसलेला आहे. राजस्थान येथील एका तोतयाने त्याची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी- विक्री करताना शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

त्याचे झाले असे, राजेंद्र गुप्ता यांना गीर जातीच्या गाई घ्यायच्या होत्या. या दरम्यान त्यांनी ऑनलाईन जाहिरात पाहिली. राजस्थान येथील सुबेन सिंगा यांना संपर्क करुन गाईची विचारपूस करुन एका गाईची किमंत 22 हजार रुपये ठरवून अशा चार गाईंची खरेदी त्यांना करायची होती. याबाबत राजेंद्र गुप्ता आणि सुबेन सिंगा यांच्याच सातत्याने चर्चा झाली. दरम्यान, सुबेन याने राजेंद्र गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. एवढेच नाही तर चार गाईंची किंमंत आणि वाहतूकीचा खर्च असे 97 हजार रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावरही अदा केले.

मात्र, खरेदी केलेल्या गाई काय राजेंद्र गुप्ता यांना मिळालेल्याच नाहीत. केवळ राजस्थान येथील एका अनोळखी इसमावर विश्वास ठेऊन अदा केलेली रक्कम आता गुप्ता यांच्या अंगलट आली आहे. त्यांनी राजस्थान येथील नातेवाईकांना याबाबत चौकशी करण्याचे सांगितले तर भलतेच सत्य समोर आले आहे. किसनगढ राजस्थान येथे गीर गाईची विक्री करणारी कंपनीच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गुप्ता यांना लाखोंचे नुकसान झालेले आहे. ऑनलाईन खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग आनंत देविदास तेरखडकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी ?

* जनावरांची ऑनलाईन खरेदी-विक्री हे प्रमाण वाढत आहे. ही सोपी पध्दत असली तरी यामध्ये धोकाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईद्वारे जनावरांची पाहणी करावी पण ऑनलाईन रक्कम अदा करु नये. केवळ टोकण रक्कम देऊन व्यवहार फिक्स करायला पाहिजे. * जनावरं आपल्या गोठ्यात आल्यावरच रोख रक्कम किंवा ऑनलाईन पैसे अदा करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष डिलेव्हरी न होता पैसे दिले तर फसवणूक होण्याची शक्यता असते. * शेतकरी आणि विक्रीदार यांच्यात झालेल्या संवादाच्या आधारे संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस देता येते. शिवाय असे करुनही दखल घेतली नाही तर मग कायदेशीरित्या कोर्टात केस दाखल करावी लागणार आहे. * नोटीस देऊनही संबंधित व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तर मग पोलीस ठाण्यात जाऊन आपली बाजू मांडावी लागणार आहे. पोलीस कारवाई हा देखील एक पर्याय आहे. मात्र, याकरिता शेतकरी आणि जनावरांची विक्री करणारा यांच्यात काय संवाद झाला आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

बाजार ऐवजी ऑनलाईनवरच अधिकचा भर

जनावरे विक्री-खरेदीच्या साईट्स आता निर्माण करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून जनावराचे वजन, येतं, साईज हे दाखवले जाते. मात्र, यावरुन जनावराची केवळ पाहणी करावी प्रत्य क्ष व्यवहार करु नये असा सल्ला आनंत देविदास तेरखडकर यांनी दिला आहे. (Purchase of animals through online, cheating of farmers, what care should farmers take)

संबंधित बातम्या :

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.