Kharif Season : रब्बीत नुकसान, खरिपात भरपाई, योग्य कांदा जातीच्या निवडीने उत्पादनात होणार विक्रमी वाढ
भीमा फिक्कट लाल जातीच्या कांद्याचा रंगही फिक्कट असतो. उत्पादनाच्या दृष्टीने हाच कांदा योग्य असून लागवडीपासून छाटणीपर्यंत योग्य नियोजन झाले तर शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. याची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी विक्रमी उत्पादन तर मिळतेच पण याची लागवड शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगामातही करता येते.
मुंबई : कांदा हे (Cash Crop) नगदी पीक असून यामधून अधिकचे उत्पादन मिळावे ही शेतरकऱ्यांची कायम भावना राहिलेली आहे. मात्र, उत्पादनात वाढ झाली तरी घटलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडले जाते. यंदाच्या (Rabi Season) रब्बीतही शेतकऱ्यांना हा अनुभव आलेला आहेच. आता इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी कांद्याच्या अनेक प्रकार विकसित केले आहेत. ज्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग होणार आहे. (Agricultural Scientists Research) कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन केलेल्या बियाणांच्या माध्यमातून उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ होणार आहे. या कांद्यातील एक प्रकार म्हणजेत भीमा सुपर होय. लाल रंगाचा व आकारानेही लक्ष वेधणाऱ्या या कांद्याचा समावेश आहे तर यामधून हेक्टरी 20 ते 22 टन उत्पादन मिळते. विशेष म्हणजे कोशिंबीर बनवण्यासाठी या लाल कांद्याचा अधिकचा उपयोग केला जातो. भीमा या लाल कांद्याचे वाण असून तो लंबूळक्या आकाराचा आहे. याचे हेक्टरी 20 ते 22 क्विंटल असे उत्पादन आहे. तर काही वाण हे रब्बी आणि खऱीप दोन्ही हंगामात घेता येतात.
दर मिळला तरच विक्री
शेतकऱ्यांकडील कांदा हा टिकून राहिला जात नाही. कारण त्यापध्दतीची सोय शेतकऱ्यांकडे नसते. त्यामुळे कांदा लागवडीपेक्षा उत्पादित झालेला कांदा साठवणूसाठी यंत्रणा उभी राहणे गरजेचे आहे. भीमा लाल जातीचा कांदा हा रब्बी आणि खरिपातही लागवड करता येतो. हा कांदा मध्यम लाल असून याचा लंबुळका असा आकार आहे. रब्बी हंगामातील लागवडीसाठी या कांद्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत तर त्याचे हेक्टरी उत्पादन हे 28 ते 32 टन एवढे आहे. पोषक वातावरणानंतर कांद्याचे विक्रमी मिळते पण काढणी झालेला कांदा साठणूक करुन ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.
उशिरा लागवडीनेही शेतकऱ्यांचाच फायदा
भीमा फिक्कट लाल जातीच्या कांद्याचा रंगही फिक्कट असतो. उत्पादनाच्या दृष्टीने हाच कांदा योग्य असून लागवडीपासून छाटणीपर्यंत योग्य नियोजन झाले तर शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. याची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी विक्रमी उत्पादन तर मिळतेच पण याची लागवड शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगामातही करता येते. शिवाय या कांद्याच्या लागवडीला उशिर झाला तर त्याला अधिकचा लालचा रंग चढतो. त्याच्या चकाकीमुळेन मागणीत वाढ होते. शिवाय वाढीव दरामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होत आहे. साठवणुकीसाठी हे योग्य आहे. रब्बी हंगामात त्याचे उत्पादन हेक्टरी 28-30 टन होते. तर खरिपात त्याचे उत्पादन हेक्टरी 35-40 टन आहे.
खरिपात नुकसान भरुन काढण्याची संधी
यंदा रब्बी हंगामात कांद्याला योग्य दरच मिळाला नाही. उत्पादन वाढून देखील शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. आता उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे पर्याय समोर येत असून भीमा लाल कांदा त्यापैकीच एक वाण असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शिवाय खरिपातील लाल कांद्याला मागणी असल्याने उन्हाळी कांद्यापेक्षा याला अधिकचा दर मिळतो असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.