Rabi Season: मुबलक पाणी असतनाही रब्बी पिके धोक्यात, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाच्या संकटानंतर आता वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील बहरत आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकरी प्रयत्न करीत असताना आता उस्माबाद जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे विद्युत पुरवठ्याचे. पिकांसाठी पाणी मुबलक प्रमाणात आहे पण गेल्या चार दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, जिल्ह्यांमध्ये कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे.
उस्मानाबाद : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाच्या संकटानंतर आता वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील बहरत आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने (farmers) शेतकरी प्रयत्न करीत असताना आता उस्माबाद जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे विद्युत पुरवठ्याचे. पिकांसाठी पाणी मुबलक प्रमाणात आहे पण गेल्या चार दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, जिल्ह्यांमध्ये (Agricultural pumps) कृषीपंपाचा (power supply cut) विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. वाढत्या थकबाकीमुळे हा निर्णय घेतला जात आहे. पण आता पिके जोपासण्यासाठी पाणी पुरवठा करणे गरजेचे असतानाच असा निर्णय का असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. मात्र, विद्युत पुरवठा सुरु ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांना प्रत्येक कृषीपंपासाठी लागलीच 5 हजार रुपये अदा करावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात असून पीक जोपासण्यासाठी हा शेवटचा पर्याय राहणार आहे.
काय आहेत महावितरणचे नियम?
महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीसाठी जाचक अटी शेतकऱ्यांवर लादल्याने अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना विद्युत विभागाने थकीत वीज बिल भरण्यासाठी चक्क वेठीस धरले आहे. बील भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत असेच महावितरणचे कर्मचारी सांगत आहेत. शेतातील कृषीपंपाना वीज पुरवठा सुरू नसल्याने पाणी असून पीक वाया जात आहेत. तीन, पाच व साडे सात एचपी पंपाला प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून वीज बिलापोटी वसुलीचे आदेश देण्यात आले आहे. अन्यथा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे.
खरीप पाण्यात तर पाण्याविना रब्बी धोक्यात
यंदा शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका खरिपानंतर आता रब्बी हंगामातही कायम आहे. खरीप हंगामावर आस्मानी संकट तर आता रब्बी हंगामावर सुलतानी संकट ओढावलेले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते तर आता पाणी असूनही त्याचा विजेअभावी पुरवठा करता येत नसल्याने पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. कृषीपंपाकडे थकबाकी असल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीने दिले आहेत. त्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडीतही करण्यात आला आहे. पणी असूनही शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या अपेक्षांना महावितरणचा शॅाक
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाच्या संकटानंतर आता कुठे वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सुर्यफूल, ज्वारी ही पीके बहरत होती. शिवाय पाणी मुबलक असल्याने खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे. शिवाय वातावरणही पोषक निर्माण झाले आहे. सर्वकाही सुरळीत असताना महावितरण कंपनीने आपला मोर्चा आता मराठवाड्याकडे वळविला आहे. प्रत्येक कृषीपंपाच्या थकबाकीपोटी 5 हजार रुपये अदा करा अन् विद्युत पुरवठी सुरु ठेवा असेच आवाहन केले जात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे भवितव्य महावितरणमुळेच अंधारात आहे.