तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग ‘अशी’ घ्या काळजी

खत कोणते याची माहितीच शेतकऱ्यांना नसल्याने उत्पादनात घट किंवा बियाणे उगवलेच नाही अशा तक्रारी ह्या वाढत आहेत. सध्याही रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य खताची निवड न केल्यास उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खत घेताना कोणत्या बाबींचा विचार करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत..

तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग 'अशी' घ्या काळजी
रासायनिक खत
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 5:18 PM

लातूर : हंगाम रब्बीचा असो की खरीपाचा रासायिनक (chemical fertilizer) खताशिवाय उत्पादनात वाढ नाही ही भावना शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करण्यापूर्वी खताची उपलब्धता आहे की नाही याची चौकशी केली जाते. काळाच्या ओघात अनेक वेगवेळ्या प्रकारची खते ही बाजारात दाखल झालेली आहेत. शेतकरीही विक्रेत्याच्या सल्ल्यानुसारच खरेदी करतात. मात्र, आता गावागवात (krishi seva kendra ) कृषी केंद्र ही थाटण्यात आलेली आहेत. यामध्ये चांगले खत कोणते याची माहितीच शेतकऱ्यांना नसल्याने उत्पादनात घट किंवा बियाणे उगवलेच नाही अशा तक्रारी ह्या वाढत आहेत. सध्याही रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य खताची निवड न केल्यास उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खत घेताना कोणत्या बाबींचा विचार करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत..

बदलत्या काळाच्या ओघाच सेंद्रिय शेतीपध्दत ही नामशेष होत आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने रासायनिक खतांचा मारा वाढलेला आहे. असे असले तरी बोगस खत विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

1) पीकानुसार कोणते खत घ्यावयाचे हे ठरवले जाते पण खताची खरेदी केली की विक्रेत्याकडून पक्की पावती घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर वॅट नंबर त्या पावतीवर असणे आवश्यक आहे. जर भविष्यात खतामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा क्लेम शेतकरी हे ग्राहक मंचाकडे किंवा पंचाय़त समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे आपण क्लेम करुन नुकसानभरपाईची मागणी करु शकतो. मात्र, यासाठी पक्की पावती आणि त्या पावतीवर वॅट क्रमांक असणे आवश्यक असते.

2) खताच्या गोणीवर हिरवे, पिवळे, लाल असे उलटे त्रिकोण असतात. यामध्ये हिरव्या रंगाचा त्रिकोण हा कमी विषारी असतो तर पिवळा हा मध्यम आणि लाल रंगाचा त्रिकोण हा अधिक विषारी असतो. पीकानुसार त्याची निवड ही करावी लागते. या किटकनाशकाचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करुन फवारणी करावी लागणार आहे.

3) शेतकऱ्यांनी शक्यतो सयुक्त खतांचा वापर करावा आणि त्याची मात्रा ही विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार देणे आवश्यक आहे. सयुक्त खत हे उपलब्ध नाहीत झाले तर स्वतंत्र खत घेऊन त्याचे मिश्रण करावे आणि फवारणी करणे फायद्याचे राहणार आहे.

4) पक्की पावती म्हणजे पक्के खत. त्यामुळे पावतीवरच समजते की खत पक्के आहे की, बोगस. शिवाय खताच्या पोत्यावर जे दर आहेत त्याच दरानुसार विक्री केली जाते की नाही याची चौकशी महत्वाची आहे. जर यामध्ये अनियमितता आढळून आल्यास कृषी अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्याची शिफारस आहे.

भरारी पथकांची नेमणूक

बोगस खत किंवा खतांचा साठा करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक पथक नेमले जाते. तालुक्याची ठिकाणी या पथकातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यामुळे खत विक्रेत्यांवर अंकूश राहतो व वेळेत शेतकऱ्यांना खत मिळते. (Rabi Season: Farmers should take care while buying fertilizers)

संबंधित बातम्या :

कृषी सल्ला : पावसाच्या उघडीपीचा ‘असा’ घ्या फायदा

‘टॅगिंग’च्या उपक्रमात राज्यातील 53 साखर कारखाने, थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल

हरभऱ्याला पोषक वातावरण, अनुदानही मिळणार प्रतिक्विंटल अडीच हजाराचे, असा घ्या लाभ

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.