खरीप गेलं…रब्बी पदरात पाडून घ्या : रब्बीची लगबग अन् खरीपाची काढणी, शेतकऱ्यांनी नेमके करावे काय?
शेतामधील ओल कायम असताना (rabi sowing) रब्बीची पेरणी करुन घ्यावी लागणार आहे. अन्यथा ओल उडाली तर पुन्हा रब्बीतील पिकांची उगवण होणार की नाही याची धास्ती राहणार आहे. रब्बीची पेरणी यंदा तब्बल महिन्याभराने उशीरा होत आहे. आता पेरणीचे दिवस असताना शेतकरी मात्र, खरीपातील (Cotton) कापूस, सोयाबीन काढणीची कामे करीत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत (Decision of farmers) शेतकऱ्यांनी नेमके काय करावे हे महत्वाचे आहे.
लातूर : उत्पादन मिळो अथवा न मिळो शेतकऱ्यांना कष्टाशिवाय पर्यायच नाही. पावसामुळे खरीपातील पिकांची काढणी मुश्किल झाली होती आता तीच शेतामधील ओल कायम असताना (rabi sowing) रब्बीची पेरणी करुन घ्यावी लागणार आहे. अन्यथा ओल उडाली तर पुन्हा रब्बीतील पिकांची उगवण होणार की नाही याची धास्ती राहणार आहे. रब्बीची पेरणी यंदा तब्बल महिन्याभराने उशीरा होत आहे. आता पेरणीचे दिवस असताना शेतकरी मात्र, खरीपातील (Cotton) कापूस, सोयाबीन काढणीची कामे करीत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत (Decision of farmers) शेतकऱ्यांनी नेमके काय करावे हे महत्वाचे आहे. पण कृषितज्ञांचे म्हणने हे वेगळेच असून जर रब्बी पेरणीचा कालावधी हा निघून गेला तर खरीप हंगामाचीच पुनावृत्ती होणार आहे. त्यामुळे काय म्हणने आहे कृषीतज्ञांचे हे जाणून घ्या..
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि ऑक्टोंबर महिन्याच्या सुरवातीलाच रब्बी हंगामातील पेरणीचा श्रीगणेशा हा होत असतो. यंदा मात्र, पावसाने सर्वच चित्र हे बदलले आहे. ऑक्टोंबरच्या अखेरीसपर्यंत पावसाचेच थैमान राहिल्याने खरीपातील सोयाबीन, कापूस काढणीचीच कामे रखडलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीला सुरवातच झालेली नाही. मात्र, असे असले तरी योग्य वेळी पेरणी झाली तरच रब्बीतील उत्पादन पदरी पडणार आहे…त्यामुळे कसे करावे नियोजन याबाबत कृषी अधिकारी बनसावडे यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला सल्ला
सोयाबीनची काढणी कामे उरका मळणी मात्र
सध्या मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर ऊनाचा कहर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढणी आता सुकर जात आहे. सोयाबीनची काढणीच नाही तर काढलेले सोयाबीन सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे. पावसाचे पुनरागमन झाले तरी अधिकचा धोका होणार नाही. आता काढणी झाली मग मळणीही उरकून घेऊ असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो मात्र, यातच वेळ खर्ची केला तर रब्बीवर संकट ओढावणार आहे.
शेतजमिनीतील ओल महत्वाची
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओल उडणार नाही या संभ्रमात शेचकऱ्यांनी राहू नये. कारण मराठवाड्यातील शेतजमिनी ह्या हलक्या स्वरुपाच्या आहेत. शिवाय दोन दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात ऊनाचा पारा वाढलेला आहे. अशात जर जमिनीची ओल उडून गेली तर पुन्हा शेत ओलवून पेरणी करावी लागणार आहे. एकतर पेरणीला महिन्याभराचा उशीर झाला आहे. त्यात पुन्हा वेळ खर्ची केला तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
हलक्या स्वरुपाची मशागत
रब्बीसाठी नांगरण, मोगडण करावीच असे काही नाही. खरीपाचे मोकळे झालेल्या क्षेत्रावर कोळपणी केली तरी पेरणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही वाचणार आहे आणि वेळेचीही बचत होणार आहे. शेतजमिनीतील तण वेचणी करुन वेळेत पेरणी झाली तर त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.
गहू- हरभरा हीच मुख्य पीके
खरीपात सोयाबीन आणि रब्बीत गहू आणि हरभरा हीच मुख्य पीके आहेत. हरभऱ्याचे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणे वाटपही करण्यात आलेले आहे. शिवाय यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बागायती क्षेत्रावर पाण्याची कमतरता भासणार नाही. केवळ पेरणी आणि पीकाची निवड हेच महत्वाचे राहणार आहे. मराठवाड्यात हरभरा य़ाच पीकावर शेतकऱ्यांचा भर असतो.
म्हणून हलकी मशागत गरजेची
रब्बी हंगामातील पेरणी ही शेतीची मशागत न करताच केली जाते. पूर्वी शेतामध्ये अधिकचे तण असल्याने ही मशागत केली जात होती. पण आता तणनाशक फवारणीचे पेव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीमध्ये वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन चाढ्यावर मूठ धरत आहे. याचा उत्पादनावरही काही परिणाम होत नाही. (Rabi Season: Timely sowing is required for production of rabi excess)
संबंधित बातम्या :
VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा…!
हमीभाव केंद्रकाडे कोण फिरकणार ? बाजारात ‘पांढऱ्या सोनाल्या’ला अधिकचा दर
शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क ; मात्र, अद्यापही विमा नुकसान भरपाईचे घोडे अडलेलेच ; काय आहे वास्तव ?