आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की

यंदा सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. केवळ हंगामातच नाही तर आता अवकाळी पाऊसही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. कारण पेरणीला उशीर होत असल्याने मध्यंतरी पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली होती. मात्र, पेरणी होताच ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पेरलेलं उगवच नाही. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे.

आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की
अवकाळी पावसामुले उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढावली आहे
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 4:12 PM

लातूर : यंदा सरासरीच्या तुलनेत  ( Heavy Rain) अधिकचा पाऊस झाला आहे. केवळ हंगामातच नाही तर आता अवकाळी पाऊसही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. कारण पेरणीला उशीर होत असल्याने मध्यंतरी पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली होती. मात्र, पेरणी होताच ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पेरलेलं उगवच नाही. त्यामुळे आता (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर ( Double sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. जमिनीतील ओल उडून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड केली मात्र, एका पावसाने सर्व मेहनत आणि पैसा वाया गेला असून आता मराठवाड्यात दुबार पेरणीला सुरवात झाली आहे.

ज्वारी हे रब्बीतील प्रमुख पिक आहे. यंदा अधिकच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी हलक्या प्रकारची मशागत करुन पेरणीला सुरवात केली होती. शिवाय शेत जमिनीतील ओल उडाली तर पुन्हा शेत ओलवून पेरण्याची नामुष्की होती. त्यामुळे लगबग करुन ज्वारीचा पेरा केला. मात्र, पेरणीनंतर अवघ्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उगवण होणाऱ्या ज्वारीवर परिणाम झाला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर या ठिकाणी पेरणी झालेल्या क्षेत्रावर ज्वारीची उगवणच झालेली नाही.

अधिकच्या पावसामुळे जमिनी आवळून आल्या

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला होता. ऑक्टोंबर अखेरपर्यंत पाऊसच होता. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडणार हे अपेक्षित होते. शिवाय अचानक पावसाने उघडीप दिल्याने शेत जमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे पेरलेले उगवते की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. यामध्येच अवकाळी पाऊस झाल्याने पेरणीला 10 दिवस झाले तरी उगवणच झाली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

दुष्काळात तेरावा

खरिपातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. असे असताना रब्बी हंगामातील पेरणीला उशिर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ट्रक्टरच्या सहायाने पेरणी उरकती घेतली मात्र, पेरलेले उगवलेच नाही. ट्रक्टरच्या सहायाने पेरणीसाठी एकरी 1500 रुपये शेतकऱ्याला मोजावे लागले होते. पैसा तर गेलाच शिवाय आता दुबार पेरणीचे कष्ट हे वेगळेच. त्यामुळे पावसाचा परिणाम केवळ खरिपातील पिकांवरच नाही तर रब्बीच्या पिकांवरही पाहवयास मिळत आहे.

बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये

दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.

संबंधित बातम्या :

कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा फळबागायत शेतकऱ्यांना काय आहे सल्ला ?

…म्हणून सोयाबीनची घटत आहे आवक, लातूर बाजार समितीमध्ये केवळ 8 हजार क्विंटलची आवक

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.