पुढील तीन दिवस पावसाचे, काढणी झालेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची

गेल्या सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामाला वेग आला होता. त्यामुळे सोयाबीन काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर तुरीचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलेले आहे. पण आता काढणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे कारण 16 ते 18 ऑक्टोंबर दरम्यान पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पुढील तीन दिवस पावसाचे, काढणी झालेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 11:23 AM

लातूर : गेल्या सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामाला वेग आला होता. त्यामुळे (soyabean harvesting) सोयाबीन काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर तुरीचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलेले आहे. (Return of rain) पण आता काढणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे कारण 16 ते 18 ऑक्टोंबर दरम्यान पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पीक काढणीपेक्षा त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक महत्वाची आहे. आता परतीच्या पावसाला सुरवात झाली असून या दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत..

पावसाने खरीप पीकांचे नुकसान तर केलेच आहे. पण आता काढणी झालेल्या धान्याला पावसाचा धोका निर्माण झाला आहे. शेतामध्ये पाणी साचले असताना शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली. मराठवाड्यात 10 ऑक्टोंबरपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतशिवारात केवळ सोयाबीन काढणीची कामे सुरु आहेत. मात्र, पावसाचे पाणी जागोजागी साचल्याने मळणीची कामे रखडलेली आहेत. आता सोयाबीनची काढणी झालेली असली तरी मळणीसाठी बनीम लावून ठेवण्यात आलेल्या आहेत. यातच पुढील तीन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे. शिवाय या पावसाचा परिणाम आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावयाची याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे.

वातावरणात बदल

हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी 16 ऑक्टोंबरपासून पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी याची चूणुक 15 ऑक्टोंबरपासूनच पाहवयास मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गेल्या सहा दिवसांपासून आकाश निरभ्र होते मात्र, आज वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग आले आहेत. यापुर्वीच पावसामुळे खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण आता काढणी केलेल्या पीकालाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे.

सोयाबीनची काढणी झाली आता पुढे काय?

पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी सोयाबानची काढणी उरकली आहेत. सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचले असतानाही ही कामे उरकून एका ठिकाणी साठवणूक करण्यात आली आहे. पण आता शनिवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शिवाय काढणी झालेले सोयाबीन हे देखील पावसात भिजणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे.

बदलत्या वातारवरणाचा द्राक्ष बागांनाही धोका

पावसाबरोबरच वातावरणातही बदल होणार आहे. त्यामुळे केवळ खरीपातील पीकांनाच नाही तर फळबागांवरही या वातावरणाचा परिणाम होणार आहे. द्राक्षाचे पीक आता तोडणी अवस्ठेत आहे. मात्र, धुई, धुके यापासून धोका आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार यांनीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे. 11 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान, थंडी व सुर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे या वातावरणात सोयाबीनची काढणी-मळणी तर कापसाची वेचणीची कामे पार पडणे आवश्यक आहे. 16 ऑक्टोंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा धोका असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा धोका

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र त्यांना लागूनच आकाशात चक्राकार वारे वाहत आहे. या कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान पूर्व पश्‍चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   (Rain forecast, advice for farmers to take proper care of harvested crops)

संबंधित बातम्या :

तुर उत्पादन वाढीचा अनोखा ‘फंडा’, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला ?

…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, विक्रीपूर्वी करा ‘ही प्रक्रिया’, शेतकऱ्यांना कृषीतज्ञांचा सल्ला

शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनची आवक वाढली दर घटले, बाजारपेठेत चिंतेचे ढग

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.