शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : खरिपातील पुनरावृत्ती रब्बीतही होणार का? पिकांची जोपासणा केली तरच उत्पादन पदरात
निसर्गाचा लहरीपणा केवळ खरीप हंगामापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर रब्बी हंगामातील पिकांवरही हे संकट कायम राहिलेले आहे. यापूर्वी रब्बीच्या सुरवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले होते तर आता पीक बहरून काढणीच्या प्रसंगी पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नंदूरबार : निसर्गाचा लहरीपणा केवळ खरीप हंगामापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांवरही हे संकट कायम राहिलेले आहे. यापूर्वी रब्बीच्या सुरवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले होते तर आता पीक बहरून काढणीच्या प्रसंगी पुन्हा (Untimely Rain) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदूरबार जिल्ह्यात 7 मार्च ते 9 मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगामातील (Crop Damage) पिकांचा काढणी सुरु आहे तर ज्वारी, गहू ही पीके अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे.
हवामान विभागाचा काय आहे अंदाज?
नंदूरबार जिल्ह्यात सोमवारपासून सलग तीन दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.पुढील पाच दिवसात जिल्ह्यात तापमान ही वाढणार असून तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाबरोबर कडक उन्हाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाचे काय आहे आवाहन?
आतापर्यंतच्या पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, खरिपाप्रमाणेच रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून काढणी झालेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणा साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व असलेले मका हरभरा ज्वारी गहू पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे तसेच पेरणी केलेल्या पिकात पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे करून घ्यावे जेणेकरून जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहील. आतापर्यंत सर्वकाही पोषक असल्याने पिके जोमात आहेत त्यामुळे तीन दिवस योग्य निघराणी केली तर उत्पादनही पदरी पडणार आहे.
हरभरा, गव्हाची काढणी, ज्वारी वावरातच
यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झालेली आहे. शिवाय रब्बी हंगामातील हरभरा आणि गव्हाच्या काढणीला सुरवात झाली आहे तर दुसरीकडे पेरणी दरम्यानच झालेल्या पावसामुळे ज्वारीचा पेरा उशिराने झाला होता. ज्वारी ही वावरातच उभा असून जर अवकाळी पावसाने हजेरी लावली तर बहरात आलेली ज्वारी काळवंडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. हरभरा, गव्हाची काढणी झाली असून सुरक्षित ठिकाणी साठवणूक महत्वाची आहे.
संबंधित बातम्या:
Organic Farm : हिमाचल प्रदेशचा नैसर्गिक शेतीचा आराखडा तयार, जिथे सुरवात झाला त्या महाराष्ट्रात काय?
पिकांमधील कीड व्यवस्थापनात पिवळ्या अन् निळ्या चिकट सापळ्यांची काय भूमिका?