Sugar Factories : शेवटी ऊसतोड मजुरच आले कामी, पावसाने यंत्रांची चाके रुतलेलीच

काळाच्या ओघात ऊसतोडणीमध्येही अमूलाग्र बदल होत आहे. मजुरांची जागा आता अत्याधुनिक यंत्र घेत आहेत. यंदाच्या हंगामात तर ऊसतोडणीसाठी सर्रास यंत्राचा वापर केला जात होता. त्यामुळे वेळीची बचत तर होत होती पण मजुरांच्या हाताला काम मिळते की नाही अशी स्थिती झाली होती. पण या ऊसतोडणी यंत्राची चाके पावसाने उघडीप देऊन 5 दिवसाचा कालावधी लोटला तरी रुतलेलीच आहेत.

Sugar Factories : शेवटी ऊसतोड मजुरच आले कामी, पावसाने यंत्रांची चाके रुतलेलीच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 12:47 PM

कोल्हापूर : काळाच्या ओघात (Sugarcane harvesting) ऊसतोडणीमध्येही अमूलाग्र बदल होत आहे. मजुरांची जागा आता अत्याधुनिक यंत्र घेत आहेत. यंदाच्या हंगामात तर ऊसतोडणीसाठी सर्रास यंत्राचा वापर केला जात होता. त्यामुळे वेळीची बचत तर होत होती पण मजुरांच्या हाताला काम मिळते की नाही अशी स्थिती झाली होती. पण या ऊसतोडणी (machine failure) यंत्राची चाके पावसाने उघडीप देऊन 5 दिवसाचा कालावधी लोटला तरी रुतलेलीच आहेत. त्यामुळे पुन्हा ऊसतोडणीला मजुरांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे. यामुळे यंत्रधारकांचे नुकसान तर झालेच आहे शिवाय अजून 15 दिवस तरी यंत्राने ऊसतोडणी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात अधिक परिणाम

अधिकतर प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी ही यंत्राच्या सहाय्याने केली जाते. मात्र, येथील शेतजमिन अधिकच सुपिक असल्याने पावसाने उघडीप देऊन 5 दिवस उलटले तरी अद्यापही वाफसे हे झालेले नाहीत त्यामळे ऊसतोडणाचे यंत्र हे वावरात जाऊच शकत नाही. शिवाय मशिन चालवणे, ट्रॉलीमध्ये कांड्या भरणे आदी कामासाठी मशिनच शेतात न्यावे लागते. सध्या कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत ऊसाचा पुरवठा अनिवार्य आहे. यामुळे कारखानदार ऊस तोडणी कामगारांकडूनच जास्तीत जास्त तोडणी करून घेत आहेत. यामुळे पुरवठा हा कमी होत असला तरी कारखान्याचे गाळप सुरु राहणे महत्वाचे आहे.

15 दिवस तरी मजुरांच्याच हाताला काम

ऊसगाळप हंगाम ऐन मध्यावरच असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मध्यंतरी तर कारखाने हे बंद ठेवावे लागले होते. आता कारखाने सुरु झाले आहेत पण त्यांची मदार ही ऊसतोड मजूरांवर आहे. भविष्यात जो ऊस यंत्राच्या सहाय्याने तोडणी करायचा होता तो देखील आता मजुरांकडून तोडला जात आहे. कारण अजून 15 दिवस तरी वाहने हा ऊसाच्या फडापर्यंत जाऊ शकत नाहीत. शिवाय तोडणीला आलेल्या ऊसाचे गाळप महत्वाचेच आहे अन्यथा वजनात घट ही समस्या उद्भवणार आहे. त्यामुले मजुरांकडूनच ऊसतोडणीवर कारखान्यांचा भर आहे.

कोट्यावधींच्या मशीन आता एक ठिकाणीच उभा

यंत्राद्वारे ऊसतोडणीचा प्रयोग तसा पश्चिम महाराष्ट्रातच अधिक प्रमाणात केला जातो. कारण या भागाच एकलगत ऊसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे तोडणीही शक्य होते. यंदा तर ऊसतोड मशीनची संख्या गतवर्षीपेक्षा वाढलेली होती. कोट्यावधी रुपये खर्च करुन ऊसतोडणी यंत्रे हे खरेदी केली आहेत. मात्र, यंदा पहिल्याच वर्षी अवकाळीचा परिणाम ह्या यंत्रावरही झाला आहे. अनेक दिवसांपासून मशीन ह्या एकाच ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

कांद्याने केला वांदा : 2 एकरातील कांदा पिकात सोडली जनावरे, अतोनात खर्च अन् हतबल शेतकरी

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या ‘कृऊबा’ चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटकाhttps://www.youtube.com/watch?v=Fv7s1YGCdSY

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.