दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा धोका, रब्बी हंगामातील पेरण्याही लांबणीवर !
. ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लातूर : पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी पुन्हा दिवाळीमध्ये पाऊस (Rain Forecast) पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. (Rabi season sowing delayed) पुर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणी होताच पाऊस झाला तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा रब्बी हंगामाला पोषक वातावरण असल्याने शेतकरी पुर्वमशागत आणि पेरणीच्या तयारीला लागला आहे. असे असतानाच हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा पावसाचे संकेत दिले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. आगामी महिन्यातील 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकेपासून 250 किमी अंतरावर चक्रीवादळ तयार होत आहे. त्या वादळामुळे देशातील सहा राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी होण्याच्या आगोदरच नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे.
या पिकांची घ्या काळजी
खरीपातील कापूस वगळता अन्य पिकांची काढणी-मळणी ही झालेली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही शेतरकऱ्यांनी सोयाबीन वाळवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या काळाच्या दरम्यान सोयाबीन हे सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे तर कापसाच्या वेचणीची कामेही सुरु आहेत. यवतमाळसह महाराष्ट्रात कापूस वेचणी सुरु आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी एक वेचणी करुन घेणे गरजेचे आहे अन्यथा कापसाच्या बोंडाचे नुकसान होईल.
वाफसा झालेल्या क्षेत्रावर पेरणी गरजेची
सध्या पावसाने उघडीप दिल्याने हलक्या प्रतीच्या जमिनक्षेत्रावर वाफसा म्हणजे ते क्षेत्र हे पेरणीलायक झाले आहे. अशा क्षेत्रावर यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास वेळेची बचत होणार आहे. अन्यथा खरीपात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या तर आता पावसामुळे रब्बीच्या पेरण्या ह्य लाबंणीवर पडणार आहेत. आगोदरच गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे एका महिन्याचा उशिर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाच अंदाज घेऊन पेरणी कामे उरकून घेण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
तापमानाचा पिकांना धोका, पिकांना कोळी किडीचा प्रादुर्भाव
बुधवारपासून हवामानात बदल होणार आहे पण तो कमी तापमानाचा. 27 ऑक्टोंबरपासून 5 दिवस तापमान हे कमी राहणार आहे. किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने वर्तवलेली आहे. या बदलत्या तापमानाचा परिणाम लिंबूवर्गीय पिकांवर होणार असल्याचे सांगितले आहे. तर रब्बी हंगामातील पूर्वमशागतीची कामे उरकून घेऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. (Rain threat again during Diwali, sowing in Rabi Hangam predicted to be delayed)
संबंधित बातम्या :
खरीपातील पिकांचे दर घसरताच शेतीमाल तारण योजनेला सुरवात, शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?
मुद्दलच नव्हे तर व्याजासकट एफआरपी रक्कम देण्याची कारखान्यावर नामुष्की
रब्बीच्या तोंडावर ‘डीएपी’ खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय…