उत्तर भारतामधील राजमा वाढतोय महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात

काळानुरुप शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. पिकाची लागवड ही त्याच्या उत्पादनावर ठरत आहे. खरिपात सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा ही ठरलेली पिके आहेत. मात्र, यामध्ये देखील आता बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारा राजमा आता महाराष्ट्रात देखील वाढत आहे. सोयाबीनप्रमाणेच कमी दिवसांमध्ये अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक म्हणून या राजमाकडे पाहिले जाते. याला श्रावणी घेवडा असेही म्हणतात.

उत्तर भारतामधील राजमा वाढतोय महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात
संग्रहीत छाय़ाचित्र
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 8:54 AM

लातूर : काळानुरुप शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. पिकाची लागवड ही त्याच्या उत्पादनावर ठरत आहे. खरिपात सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा ही ठरलेली पिके आहेत. मात्र, यामध्ये देखील आता बदल होत आहे. (North India) उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारा राजमा आता महाराष्ट्रात देखील वाढत आहे. (Soyabean) सोयाबीनप्रमाणेच कमी दिवसांमध्ये अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक म्हणून या राजमाकडे पाहिले जाते. याला श्रावणी घेवडा असेही म्हणतात.

राज्यात केवळ पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये राजमाची लागवड मोठया प्रमाणात केली जात होती मात्र यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडते म्हणून क्षेत्रामध्ये यंदा वाढ होणार असल्याचा अंदाज कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत. राज्यात केवळ 31050 हेक्‍टर क्षेत्रावर राजमाची (श्रावणी घेवडयाची) लागवड केली जात होती. पण यंदा हे क्षेत्र वाढणार आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या चा-यासाठी करता येतो. शेंगामध्‍ये अ आणि ब जीवनसत्‍व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

जमिन व हवामान कसे असावे

राजमा ( श्रावणी घेवडा) हे पिक हलक्‍या ते मध्‍यम जमिनीत पाण्‍याचा निचरा असणा-या क्षेत्रात उत्‍तम प्रकारे येते. चांगल्या प्रकारच्या जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते. परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्‍या दरम्‍यान असावा. घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळयात येणारे पिक असून 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात हेक्‍टरी पिक चांगले येते. अतिथंडी व अतिउष्‍ण हवामान या पिकास मानवत नाही.जमिनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे. तसेच पेरणीपूर्व मशागतही गरजेची आहे.

लागवडीसाठी योग्य हंगाम

राज्यात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्‍यात रब्‍बी हंगामासाठी सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात राजम्याची लागवड करतात. यामध्ये कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्‍ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश या वाणांना अधिकचे महत्व दिले जाते. तर प्रती हेक्टरी 40 किलो बियाणे लागते तर टोकन पध्दतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागते.

किड रोग व व्यवस्थापन

मावा : मावा कीड घेवडयाच्‍या पानातील रस शोषून घेते. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वळतात. मावा किड वाढणाऱ्या फांद्या आणि लहान पानांतील रस शोषून घेते. या किडीच्‍या प्रादुर्भावामुळे काहीवेळा फूलांची गळ होते. याच्यावर मात करण्यासाठी 10 लिटर पाण्‍यात सायपरमेथीन 5 मिली किंवा 10 मिली लीटर रोगोर या प्रमाणात पाण्‍यात मिसळून फवारावे.

शेंगा पोखरणारी अळी : ही किड प्रथम शेंगाच्‍या पृष्ठभागावर आढळून येते. ही किड नंतर शेंगेच्‍या आत शिरून आतील दाणे खाऊन फस्‍त करते. याकरिता 5 टक्‍के कार्बरिल दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावे

खोडमाशी : लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांत या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. या किडीचे मादी फूलपाखरू पीक पहिल्‍या दोन पानांवर असतांना पानांवर अंडी घालते. अंडी उबवल्‍यानंतर अंडयामधून अळया बाहेर पडतात. अळी खोडावर जाते आणि खोडाच्‍या आतील भाग पोखरून खाते. याचे व्यवस्थापन करण्यासाठी 10 लिटर पाण्‍यात 5 मिलीलिटर सायपरमेथीन हे कीटरनाशक मिसळून फवारणी करावी.

रोगावर असे मिळवा नियंत्रण

भूरी : हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास पानावर, काडयावर आणि शेंगावर पांढरी पावडर असलेले ठिपके दिसतात. त्यामुळे 300 मेश गंधकाची भुकटी दर हेक्‍टरी 30 किलो प्रमाणात धुराळावी. तर तांबोरा हा बुरशीजन्‍य रोग असून त्‍यात पानाच्‍या खालच्‍या भागावर तांबूस काळपट रंगाचे फोड येतात. याच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 हेक्‍टरी बुरशीनाशक मिसळून तांबेरा रोगाची लागण दिसून येताच फवारणी करावी. तर मर ह्या बुरशीजन्‍य रोगामुळे झाडांची पाने पिवळी पडून ती गळतात. याकरिता बियाण्‍यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक औषध चोळावे किंवा घेवडयाच्‍या रोगप्रतिबंधक जाती लावाव्‍यात.

संबंधित बातम्या :

फटाक्यांचा ना आवाज ना धूर तर बाहेर पडतात भाजीपाला वनस्पती

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

विमा योजनेच अव्वल असणारे नांदेड अद्यापही परताव्यात मात्र ‘वेटींग’वरच काय आहे कारण?

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.