अलमल्ली धरणाची ऊंची न वाढविता ‘या’ पर्यांयाची अंमलबजावणी करा : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे ((basavaraj bommai)) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याची माहिती देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आहे.

अलमल्ली धरणाची ऊंची न वाढविता 'या' पर्यांयाची अंमलबजावणी करा : राजू शेट्टी
अलमल्ली धरणाची ऊंची न वाढविण्याबाबत राजू शेट्टी यांनी घेतली कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 11:54 AM

कोल्हापूर : बेळगाव व दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात महापूराची समस्या ही वाढतच आहे. या महापूरास कारणीभूत ठरत असलेल्या अलमल्ली धरणाची ऊंची वाढवू नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे ((basavaraj bommai)) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याची माहिती देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आहे.

कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. त्यामुळे पूराच्या दरम्यान, लगतच्या भागात दोन-दोन किलोमीटर पाणी हे पसरते. शिवाय अत्यंत मंद गतीने या भागातील पाणी हे कमी होते. त्यामुळे बेळगाव व दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महापूरावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुशंगाने ऑगस्टपर्यंत पाणीतातळी ही 512 मीटरवर ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा या भागात पाणी साचून राहिल्याने शेतीपिकाचे तर नुकसान होणारच आहे. शिवाय लगतच्या गावांनाही धोकी राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे 6 पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील 5 पूल व दुधगंगा – वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत आहेत. तर चिकोडी तालुक्यांतील अंकली – मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले , चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे.

यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील, आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर आदी उपस्थित होते.

जलआयोगाचा अहवालानंतरच्या बैठकीत राजू शेट्टीही राहणार उपस्थित

अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्याबाबतचा अहवाल हा केंद्रीय जल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. महापूर नियंत्रणाबाबत अभ्यासगटाची नेमणूक होणार आहे. शिवया या आयोगाचा अहवाल आल्यानंतर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीस राजू शेट्टी यांना निमंत्रित करु असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.

अलमल्ली धरणाची ऊंची न वाढविता हा आहे पर्याय

अलमल्ली धरणाची ऊंची वाढवली तर दक्षिण महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात महापूराचे पाणी हे साठून राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा, वैदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावरील पुलाचा पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याचा पर्याय राजू शेट्टी यांनी बैठकी दरम्यान समोर ठेवला होता. (Raju Shetty meets Karnataka CM to ensure that Almalli dam does not rise)

संबंधित बातम्या :

मुरुम बाजार समितीच्या अनुशंगाने औरंगाबाद खंडपीठाचे मोठा निर्णय, निवडणूक अटळ

शेतकऱ्यांच्या हीतासाठी साखर आयुक्तालयाची शक्कल, मानांकनातून समोर येणार कारखान्याचा कारभार

आज ‘भारत बंद’ ; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा, या सेवांवर होणार परिणाम

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.