Latur Market : शेतकरी शेतात, बाजार समितीमध्ये शुकशुकाट
शुक्रवारी तर केवळ दीड हजार क्विंटल सोयाबीनची आवक (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजात समितीमध्ये झालेली होती. तर सोयाबीनला दर हा 5800 चा मिळाला होता. पावसाने उघडीप दिली असून शेतकरी आता शेती कामात व्यस्त आहे. काढणी झाली की पुढील आठवड्यापासून आवक वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
लातूर : दरवर्षी खरीप हंगाम सुरु झाला की सर्वाधिक आवक असते ती (Soyabean) सोयाबीनची…यंदा चित्र मात्र, उलटे आहे. हंगामाच्या सुरवातीपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही कमीच राहिलेली आहे. खरीपातील मुख्य पिक असलेले सोयाबीन हे कोणत्या ना कोणत्या कारणाने संकटात राहिलेले आहे. (Rain Effect) पावसाचा परिणाम हा उत्पादनावर तर झालाच आहे. शिवाय दरातही मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी मार्केटकडे पाठ फिरवलेली आहे. शुक्रवारी तर केवळ दीड हजार क्विंटल सोयाबीनची आवक (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजात समितीमध्ये झालेली होती. तर सोयाबीनला दर हा 5800 चा मिळाला होता. पावसाने उघडीप दिली असून शेतकरी आता शेती कामात व्यस्त आहे. काढणी झाली की पुढील आठवड्यापासून आवक वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही सोयाबीनची आवक होत असते. हंगामात दिवसाकाठी 40 ते 50 हजार क्विंटलची आवक होत असते. यंदा मात्र, दरही कमी झाले असून शेतकरी खरीपातील काढणी कामात व्यस्त आहे. त्यामुळे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमालीची शांतता आहे. तर दुसरीकडे उडीदाची आवक ही वाढत असून दरही चढा मिळत आहे. यंदा सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी उडीदाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिलेली आहे. शुक्रवारी उडीदाला 7240 एवढा दर मिळालेला होता. तर सोयाबीनला निच्चांकी 5800 चा दर मिळाला आहे.
बाजारात एखाद्या उत्पादनाची आवक घटली तर दर वाढतात हे सुत्र आहे. पण सोयाबीनच्या बाबतीत हे होताला पाहवयास मिळत नाही. आवक घटली तर दर वाढतील असा अंदाज होता पण कालच्या तुलनेत 200 रुपयांनी दर हे घसरलेलेच आहेत. उडदाच्या दरात शुक्रवारी वाढ झाली होती. लातूरची बाजारपेठ ही सोयाबीनसाठी प्रसिध्द आहे. पण यंदा नैसर्गिक संकट आणि केंद्र सरकारचे निर्णय यामुळे आवक ही दिवसेंदिवस घटत आहे. 11500 वर गेलेले सोयाबीन थेट 5800 वर येऊन पोहचले आहे. शिवाय पावसाने उघडीप दिल्याने शेती कामे सुरु झाली असून त्याचा देखील परिणा आयातीवर झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बालाजी जाधव यांनी सांगिलते आहे.
आठवड्याने वाढणार सोयाबीनची आवक
सध्या सोयाबीन काढणी कामे सुरु झाली आहेत. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन हे त्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे. त्यामुळे दिवसाकाठी केवळ दीड हजार क्विंटलची आवक हा सुरु आहे. काढणी कामे झाल्यावर सणा-सुदीच्या काळात सोयाबनची आवक ही वाढणार आहे. मात्र, दर घटतच गेले तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या दराच्या बाबतीत व्यापारीही काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील की आवक वाढल्याने अणखीन घटतील याची चिंता आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6500 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6435 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6326 रुपये क्विंटल, जानकी चना 4925 रुपये क्विंटल, विजय चणा 5250, चना मिल 4900, सोयाबीन 6851, चमकी मूग 6700 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7240 एवढा राहिला होता. (Rates did not rise despite decline in soyabean arrivals, Latur Agricultural Produce Market Committee)
संबंधित बातम्या :
पीक नुकसान मोजण्याचे नेमकं ‘एकक’ काय ? प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर होतंय काय?
देशभरात आता कृषी आवजारांची एकच किंमत, सरकार निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा
आता आंबिया फळपिकासाठीही लागू होणार पीकविमा, कृषी विभागाचा निर्णय