Rabi Wheat : शेत पिकलं सोन्यावाणी, गव्हाला हमीभावापेक्षा 4 पट अधिकचा दर
गेल्या अनेक वर्षापासून सोन-मोती हे वाण पंजाबमध्ये प्रचलित आहे. ज्यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण खूप कमी असते. तसेच गव्हाच्या या जातीमध्ये ग्लाइसेमिकचे प्रमाण आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. एकूणच गव्हाची ही प्राचीन जात उच्च पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. शिवाय काळाच्या ओघात अनेक जाती आल्या पण या वाणाचे महत्व हे कायम आहे. त्यामुळेच ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
मुंबई : (Rabi Season) रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे अमूलाग्र बदल झाला आहे. उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील परिणाम गव्हाच्या दरावर झाल्याने (Wheat Production) गहू उत्पादकांना सोन्याचे दिवस उजाडले आहेत. हमीभावापेक्षा (Market) खुल्या बाजारपेठेत गव्हाला 4 पटीने अधिकचा दर मिळत आहे. पंजाबमधील ‘सोने-मोती’ या वाणाचे खरोखरच यंदा सोनं झाले आहे. सोने – मोती हे पंजाबमध्ये पिकवले जाणारे गव्हाचे जुने वाण आहे. जो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मुख्य म्हणजे पंजाबमधील ज्या शेतकऱ्यांनी यावेळी सोने आणि मोत्याच्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे, त्यांना इतर वाणांपेक्षा या जातीच्या गव्हाच्या चारपट अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. त्याचेच समाधान आज पंजाबमधील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.
‘सोनं-मोत्या’च्या वाणाचे वेगळेपण काय?
गेल्या अनेक वर्षापासून सोन-मोती हे वाण पंजाबमध्ये प्रचलित आहे. ज्यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण खूप कमी असते. तसेच गव्हाच्या या जातीमध्ये ग्लाइसेमिकचे प्रमाण आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. एकूणच गव्हाची ही प्राचीन जात उच्च पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. शिवाय काळाच्या ओघात अनेक जाती आल्या पण या वाणाचे महत्व हे कायम आहे. त्यामुळेच ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
गव्हाला प्रति क्विंटल 8 हजाराचा दर
पंजाबमध्ये सोने-मोती वाणाच्या गव्हाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत 8 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. जे नागरिक आरोग्याच्या दृष्टीने जागृत आहेत तेच नागरिक हे या वाणाच्या गहू खरेदीला अधिक पसंती देत आहेत. एवढेच नाही तर पेरणी दरम्यानच गहू बुकींग केला जातो. द ट्रिब्यूनच्या एका अहवालानुसार खन्ना येथील बहोमजरा गावातील हरपालसिंग भट्टी या शेतकऱ्याने येथे 10 शेतकरी उत्पादक गट तयार केले आहेत. ते 30 एकरामध्ये सोने-मोती या वाणाचेच उत्पादन घेतात. यामुळे या शेतकरी गटाला दरवर्षी बक्षीस मिळते. शेतकरी भट्टी यांनी सांगितले की, यावर्षी आम्ही सोन्या-चांदीचा गहू आठ हजार रुपये क्विंटलने विकला आहे. सध्या एमएसपीवर गव्हाचा भाव 2015 रुपये प्रति क्विंटल आहे.वाढत्या उष्णतेमुळे उत्पादनात घट तर झालीच आहे. गतवर्षी एकरी 8 क्विंटलचा उतारा मिळाला होता तर यंदा 6 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.
पंजाब तसेच इतर राज्ये लोकप्रिय होत आहेत
गव्हाची सोन्या-चांदीचे वाण हे हजारो वर्षे जुनी असल्याचे मानले जाते, जे आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही लोकप्रिय होत आहे. सोने-मोती वाणाचे उत्पादन एकरी सुमारे 8 क्विंटल आहे. गव्हाच्या इतर लोकप्रिय वाणांमध्ये एकरी 20-21 क्विंटल उत्पादन मिळते, परंतु शेतकरी अजूनही सोन्याच्या मोत्यापासून एमएसपीवर इतर गव्हाच्या विक्रीतून जितका पैसा कमावतो तितका कमावत असल्याचे द ट्रिब्यूनने आपल्या अहवालात प्रख्यात बीजरक्षक डॉ. प्रभाकर राव यांनी म्हटले आहे.