नांदेड जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनची विक्रमी लागवड
नांदेडमध्ये उन्हाळी हंगामातील सोयाबीनची फलधारणा झाली आहे. त्यामुळे बेमोसमी सोयाबीन चांगलंच बहरलय. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. अतिवृष्टीचा मोठा फटका हा सोयाबीनला बसल्याचे पहायला मिळाले.

सोयाबीनचा बियाण्यांसाठी वापर
एकट्या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात सोयाबीन पिकांचे उत्पादन चांगले होईल की नाही याची भीती होती. मात्र आता सोयाबीनच्या पिकाने शेंगा धरण्यास सुरुवात केली असून, पीक फलधारनेने लगडून गेलय. गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या बियाण्यात मोठी भाव वाढ झाली असून, फसवणूकीचे प्रकार देखील वाढलेत. त्यातून उन्हाळी सोयाबीन पेरून त्यातून बियाणे मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसतंय. पावसाळी हंगामापेक्षाही उन्हाळी सोयाबीन दाणेदार आणि परिपक्व असल्याने त्याचा बियाणे म्हणून वापर वाढला आहे.
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान
संबंधित बातम्या
Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी
ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?