न्यायाधीशांनी घेतले कामगाराचे मार्गदर्शन अन् शेती व्यवसयात किमया झाली
पावसामुळे सोयाबीन काढणी मुश्किल झाली आहे आणि कसले विक्रमी उत्पादन असा सवाल तुम्हाला पडलेला आहे. मात्र, नैसर्गिक संकटाच्या एक पाऊल पुढे राहत अहमदपूर तालुक्यातील निवृत्त न्यायाधिश यांनी 18 किलोच्या बियाणांमध्ये चक्क 22 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. जाणून घेऊ त्यांच्या विक्रमी उत्पादनाचे गमक काय आहे ते...
राजेंद्र खराडे : लातूर : शेती हा बांधावरून करण्याचा व्यवसाय नाही. (Soyabean) उत्पादन पदरात पाडून घ्यायचे म्हणल्यावर हे कष्टाला पर्याय नाही, हे सर्व असले शेतामध्ये राबणाऱ्या कामगाराचे मार्गदर्शन, कृषी अधिकऱ्यांचा सल्ला आणि योग्य नियोजन करुन निवृत्त न्यायाधिश यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेतलेले आहे. पावसामुळे सोयाबीन काढणी मुश्किल झाली आहे आणि कसले विक्रमी उत्पादन असा सवाल तुम्हाला पडलेला आहे. (Latur) मात्र, नैसर्गिक संकटाच्या एक पाऊल पुढे राहत अहमदपूर तालुक्यातील निवृत्त न्यायाधिश यांनी 18 किलोच्या बियाणांमध्ये चक्क 22 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. जाणून घेऊ त्यांच्या विक्रमी उत्पादनाचे गमक काय आहे ते…
मराठवाड्यात पावसामुळे खरीपातील सोयाबीनची काढणी कामे रखडलेली आहेत. शिवाय पावसामुळे उभ्या सोयाबीनला कोंभ फुटलेले आहेत. मात्र, योग्य नियोजन आणि नैसर्गिक समस्यांचा अभ्यास केला तर संकटावर मात करता येते याचे उत्तम उदाहरण अहमदपूर तालुक्यातील सावरगाव रोकडा येथे समोर आले आहे. निवृत्त न्यायाधिश विजयकुमार बोडके पाटील यांना शेती व्यवसयाचा गंध असला तरी प्रत्यक्ष शेती करण्याचा तसा अनुभव नव्हता. अशा परस्थितीमध्ये त्यांनी यंदा कृषी अधिकारी यांच्या सल्ल्यावरून आद्रकाच्या पिकात टोकण पध्दतीने सोयाबीनची बेडवर लागवड केली होती.
पिकाला खेळती हवा आणि पुरेसा सुर्यप्रकाश मिळावा म्हणून 3 बाय 9 इंचावर लागवड केली होती. वेळप्रसंगी अनेक दिवसापासून शेतामध्ये राबणाऱ्या कामगारांचेही त्यांनी मार्गदर्शन घेऊन सोयाबीनची जोपसना केली. लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत, शेण खताचा वापर, रासायनिक खताची मात्रा, किटक नाशक औषधांची फवारणी आणि खुरपनी याचे योग्य नियोजन केल्याने सोयाबीनच्या 18 किलो बियाणाला त्यांना 22 क्विंटल उत्पादन झाले आहे. शिवाय हवामान विभागाचा सल्ला काय आहे..पावसाचा परिणाम काय होईल याचा अचूक वेध घेत त्यांनी काढणी कामाला सुरवात केली होती.
पावसाला सुरवात होण्यापुर्वीच म्हणजे 17 सप्टेंबर रोजीच त्यांनी सोयाबीनची काढणी केल्याने पावसाचा फटका बसला नाही. सोयाबीनच्या चार महिन्याच्या कालावधीत त्यांना कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने, बियाणे कंपनीचे महाजन तसेच कृषी सहायक यांचे मार्गदर्शन मिळाले होते. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये हे विक्रमी उत्पादन मानले जात आहे.
निसर्गाच्या एक पाऊल पुढे
तस पाहिला गेलं तर निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही…मात्र, हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने विजयकुमार बोडके-पाटील यांनी सोयाबीन काढणी ही 17 सप्टेंबर रोजीच उरकून घेतली होती. काढणी झालेले सोयाबीन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले व बुधवारी पावसाने उघडीप देताच त्याची मळणी करण्यात आली आहे. योग्य नियोजन केल्याने त्यांना हे विक्रमी उत्पादन झालेले आहे. शिवाय सोयाबीन हे आद्रकामध्ये आंतरपिक म्हणून घेतले होते. त्यामुळे दुहेरी फायदा त्यांना झालेला आहे.
बियाणे कमी उत्पादन जास्त
टोकण पध्दतीने सोयाबीनची लागवड ही पध्दत आता शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे. कृषी विभागाच्यावतीने याबाबत जनजागृतीही केली जात आहे. टोकण पध्दतीने 3 बाय 9 इंचावर सोयाबीनची लागवड केली तर पिकाला खेळता वारा आणि पुरेसा सुर्यप्रकाश मिळतो त्यामुळे उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होत असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाने यांनी सांगितले आहे. शिवाय टोकण पध्दतीने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करण्याचे अवाहनही त्यांनी केले आहे. (Record production of soyabean due to proper planning, unique experiment of Latur farmer)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना दिलासा : ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली
उशीरा पेरणी झालेले सोयाबीन पडेल पदरात, काढणीची अशी घ्या काळजी