तूर लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर, काय तूराचे फायदे अन् लागवड प्रक्रीया जाणून घ्या..
खरीप हंगामात जसे सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे त्याप्रमाणेच तुरीच्या उत्पादनातही महाराष्ट्र राज्याची महत्वाची भुमिका आहे. उत्पादनातून आर्थिक फायदा तर होतोच शिवाय विविध अंगाने तूर डाळीचे महत्व आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण मापक असते शिवाय पचनक्रीयाही सुधारली जाते त्यामुळे ती रुग्णांनाही दिली जाते.
लातूर : खरीप हंगामात जसे सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे त्याप्रमाणेच तुरीच्या उत्पादनातही महाराष्ट्र राज्याची महत्वाची भुमिका आहे. उत्पादनातून आर्थिक फायदा तर होतोच शिवाय विविध अंगाने तूर डाळीचे महत्व आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण मापक असते शिवाय पचनक्रीयाही सुधारली जाते त्यामुळे ती रुग्णांनाही दिली जाते. मात्र, ज्यांना बद्धकोष्ठता, पित्त आणि श्वसनाचा त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात ही डाळ खायला पाहिजे.
दैनंदिन जीवनामध्ये इतर डाळीपेक्षा या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय भाज्यांसाठीमध्येही या डाळीचा वापर केला जातो. शिवाय तूरीच्या झाडाचा वापर हा स्टेम फ्युएल, झोपड्या आणि टोपल्या बनवण्यासाठी केला जातो. राज्यात 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात तूर लागवड केली जाते.
तूर लागवडीसाठी जमिन अशी असावी..
दर्जेदार शेतजमिनीवर तूरीची लागवड केली जाते. पाण्याची उपलब्धता उथळ शेत जमिन ही या पिकासाठी सुपिक मानली जात आहे. साधारणता: 6 ते 7 एकारामध्ये हे पीक घेतले जाते.
पेरणीपुर्व मशागत
रब्बा हंगाम संपताच खरीपातील तूर पीकासाठी जमिनीची मशागत महत्वाची आहे. नांगरण, कोळपनी यामुळे शेतजमिन ही भुतभुशीत होते शिवाय आर्द्रताही वाढते. अशा प्रकारे मशागत केल्यावर पीक तर बहरात येतेच शिवाय उत्पादन वाढीसही फायदा होतो.
पेरणीची पद्धत
तूर हे खरीपातील मुख्य पीक आहे. आंतरपिक म्हणून याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये तूर + बाजरी (१: २) तूर + सूर्यफूल (१: २), तूर + सोयबीन (१: ३ किंवा १) तूर + ज्वारी (१: २ किंवा १: ४), तूर + कापूस, तूर + भुईमूग, तूर+मूग, तूर+उडीद (१:३) याप्रमाणे पेरणी केल्याने दोन्ही पिकांचे चांगले उत्पन्न होते. योग्य वेळी छाटणी आणि मशागत केली तर उत्पादनातही मोठी वाढ होते.
खत आणि पाण्याचे व्यवस्थापन
तूर हे आंतरपिक म्हणून घेतले जाते. सोयाबीन, उडीद या पिकामध्ये याची पेरणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूरीचे उत्पादन किती घ्यावयाचे आहे त्यानुसार पेरणी करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण हे अधिक असते त्यामुळे पाणी देण्याची गरज भासत नाही पण पाण्याची कमतरती भासल्यास सिंचनाची सुविधा ही करावीच लागते. पेरणीपसून ३० ते ४० दिवसांपासून हे पिक जोमात येते. ६० ते ७० दिवसांनी तूरीला फुले लागतात त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत हे पीक येते. शेंगा भरण्याच्या दरम्यान पाणी दिले तर उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
काढणी योग्य प्रकारे साठवणूक
तुरीच्या शेंगा ह्या वाळल्या की तूर काढणी योग्य झाली असे समजावे..तूर ही कापून काढली जाते. तूरीच्या शेंगा मशनरी किंवा बडवून ह्या वेगळ्या केल्या जातात. साठवून ठेवण्यापुर्वी चांगले ऊल देणे आवश्यक आहे. त्यानंतर पोत्यामध्ये साठवून ठेवावे शिवाय साठवलेल्या पोत्यामध्ये कडूलिंबाची पाने टाकली तर कीटकांपासून य़ा धान्याचे संरक्षण होणार आहे. Record production of tur dal in Maharashtra, know sowing method
संबंधित बातम्या :
राजकीय स्वा:र्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल