Silk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..!
राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषास प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये असा विक्रमी दर मिळालेला आहे. विशेष म्हणजे आता नव्याने रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे.
कोल्हापूर : शेती पध्दतीमध्ये बदल केल्याशिवाय उत्पादनात वाढ नाही. वातावरणातील बदलानुसार आता पीक पध्दतीमध्ये बदल होत असला तरी शेतकरी अजूनही मोठे धाडस करीत नाही. सध्या (Silk Farming) रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम संचलनालयही विशेष प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच राज्यात 15 हजार 795 एकरामध्ये तुतीची लागवड आहे. त्यापैकी 8 हजार 928 एकर तुती ही केवळ औरंगाबाद विभागात आहे. त्यामुळे (Maharashtra) राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषास प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये असा (Record rate) विक्रमी दर मिळालेला आहे. विशेष म्हणजे आता नव्याने रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे बाजार समितीचे सभापती सुभाशसिंग रजपूत यांच्याच हस्ते रेशीम कोषाचे सौदे झाले आहेत. राज्यात ज्याप्रमाणे रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे त्याच प्रमाणे संचालनालयाच्या माध्यमातून बाजारपेठाही उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. यामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
लागवडही वाढली अन् बाजारपेठाही उभारल्या
केवळ तुतीचे लागवडीबाबत जनजागृती करण्यात आली नाही तर झालेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची भूमिका रेशीम संचानलयाने पार पाडलेली आहे. त्यामुळे बीड, जालना यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टळला असून योग्य दरही मिळत आहे. याशिवाय रेशीम कापडाला मागणी वाढत आहे. सध्या रेशीम कोषाचे दर हे 65 ते 900 रुपये किलोंवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून महाराष्ट्राने वेगळी विक्रमही केला आहे.
रेशीम कोषच्या आवकला सुरवात
शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी म्हणून महारेशीम अभियान राबवण्यात आले होते. या दरम्यान, लागवडीपासून काढणी आणि बाजारपेठ पर्यंतचे मार्गदर्शन संचालनालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळेच क्षेत्रात वाढ झाली होती. आता जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे. मराठवाड्यात रेशीम कोषाला 55 ते 90 रुपये किलोपर्यंतचे दर मिळत आहेत. तर जयसिंगपूर येथे प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये दर मिळाला आहे. शिवाय ही सुरवात असून भविष्यात दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, रेशीम कोषातून एक नवा पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा राहत आहे.
संबंधित बातम्या :
नैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय ?
APMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा
सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?