Nandurbar Market: युध्द रशिया-युक्रेन युध्दाचा फायदा धुळ्याच्या शेतकऱ्याला, 973 च्या वाणाच्या गव्हाला विक्रमी दर
रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा खत आयातीवर झाल्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. युध्दाचा जसा हा प्रतिकूल परिणाम झाला आहे त्याच पध्दतीने शेतीमालाचे दरही या युध्दामुळे वाढले आहेत. रशियातून गव्हाची निर्यात बंद असल्याने यंदा गव्हाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण आता प्रत्यक्षात याची अनुभती येत आहे. कारण नंदूरबार बाजार समितीमध्ये गव्हाला चक्क 5 हजार 451 रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. आतापर्यंत इतिहासात असा दरच मिळालेला नाही.

नंदूरबार : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा खत आयातीवर झाल्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. युध्दाचा जसा हा प्रतिकूल परिणाम झाला आहे त्याच पध्दतीने (Agricultural Good) शेतीमालाचे दरही या युध्दामुळे वाढले आहेत. रशियातून गव्हाची निर्यात बंद असल्याने यंदा (Wheat Rate) गव्हाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण आता प्रत्यक्षात याची अनुभती येत आहे. कारण (Nandurbar Market) नंदूरबार बाजार समितीमध्ये गव्हाला चक्क 5 हजार 451 रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. आतापर्यंत इतिहासात असा दरच मिळालेला नाही. सध्या रब्बी हंगामातील गव्हाची आवक सुरु झाली असून धुळे जिल्ह्यातील छडबील येथील शेतकऱ्याच्या 973 वाणाच्या गव्हाला हा दर मिळाला आहे. गव्हाच्या लिलावात हा दर मिळाला आहे. सदरील शेतकऱ्याचे 8 क्विंटलचे 42 हजार रुपये झाले होते. बाजारपेठेत गव्हाची आवक कमी होत गेली तर दर अणखी वाढतील असा अंदाज आहे.
आवक वाढूनही विक्रमी दर
सध्या रब्बी हंगामातील पिकांची आवक सुरु आहे. नंदूरबार बाजार समितीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून गव्हाच्या आवकला सुरवात झाली आहे. दिवसाकाठी सरासरी 4 हजार क्विंटलची आवक होत आहे. असे असले तरी 2 हजार 200 ते 2 हजार 600 असेच सरासरी दर होते. पण गुरुवारी एका शेतकऱ्याच्या 973 या वाणाच्या गव्हाला तब्बल 5 हजार 451 असा दर मिळाला आहे. यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. असे असले तरी युध्दजन्य परस्थितीमुळे गव्हाला मागणी ही राहणारच असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले आहे. ही हंगामाची सुरवात आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक सुरु झालेली नाही. पण गव्हाचे असेच राहणार असल्याचे संकेत आहेत.
अवकाळी पावसाचा परिणाम
रब्बी हंगामातील सर्वच पिकांसाठी यंदा पोषक वातावरण होते. मुबलक पाणीसाठ्यामुळे हंगामी पिकेही बहरली होती. आता गव्हाचे उत्पादन सरासरीप्रमाणे मिळाले असले तरी मध्यंतरीच्या अवकाळीमुळे उताऱ्यावर परिणाम झाला होता. अन्यथा यापेक्षा अधिकच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळाले असते.या वर्षी झालेल्या आवकळी पाऊस आणि गारपीठ या मुळे गव्हाच्या उत्पादनात 20 ते22 टक्के घट आली आहे मात्र बाजारात तेजी आसल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गव्हाच्या वाढत्या दरामुळे आता गव्हापासून बनणाऱ्या खाद्य पदार्थांचेही दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांची भूमिकाही ठरणार महत्वाची
शेतकऱ्यांनी जर अधिकच्या दरासाठी गव्हाच्या साठवणूकीचा निर्णय घेतला तर मात्र यापेक्षा अधिकचा दर मिळणार आहे. यापूर्वी खरिपातील सोयाबीन आणि कापसाबाबत असेच झाले होते. शेतकऱ्यांनी योग्य दर मिळेपर्यंत या शेतीमालाची विक्रीच केली नाही. त्याचा फायदा अंतिम टप्प्यात झाला होता. गव्हाला तर हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर मिळालेला आहे.
संबंधित बातम्या:
Hapus Mango : फळांचा राजा ‘ऑनलाईन’द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात