पोषक वातावरण असतानाही रब्बी हंगाम धोक्यात, काय आहेत कारणं?
अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी भूजल पातळी वाढल्याने रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा झालेला आहे. शिवाय रब्बीच्या पेरण्याही आता सरासरीच्या निम्म्या क्षेत्रावर झालेल्या आहेत. सर्वकाही सुरळीत असताना महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहिमेला सुरवात केली आहे. वसुली मोहीम सर सरुच आहे पण 22 नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपाचे वीजबिल अदा न केल्यास कनेक्शन बंद करण्यात येणार आहे
लातूर : अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी भूजल पातळी वाढल्याने रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा झालेला आहे. शिवाय रब्बीच्या पेरण्याही आता सरासरीच्या निम्म्या क्षेत्रावर झालेल्या आहेत. सर्वकाही सुरळीत असताना महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहिमेला सुरवात केली आहे. वसुली मोहीम सर सरुच आहे पण 22 नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपाचे वीजबिल अदा न केल्यास कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. राज्यातील सर्वच विभागात ही वसुली मोहीम सुरु झाली आहे.
वाढती थकबाकी आणि कृषीपंपाकडील थकबाकी हा नेहमीचाच चर्चेचा विषय राहिलेला आहे. ऐन रब्बी हंगामाला सुरवात झाली की, शेतकऱ्यांना अडचणीत धरुन वीजबिल वसुली केली जाते. यंदाही मराठवाड्यासह सबंध राज्यात या मोहीमेला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरलेले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय शेतीपिकाचा दर्जाही ढासाळल्याने दरही कमी मिळत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही खालावलेली असतनाच आता कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीची मोहीम महावितरणकडून रावबवी जात आहे. त्यामुळे वीजबिल अदा करावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. काही ठिकाणी तर वीजपुरवठा बंद करण्यास सुरुवातही झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीक नसल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. पैसे नसताना बिल कसे भरणार, असा मुख्य मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे असून त्याच काळात वीज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
रब्बी हंगामाच्या तोंडावरच वसुली मोहीम
रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवणूक केलेल्या पाण्यावरच होत असते. याकरिता आवश्यकता असते वीजेची. मात्र, हीच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता दरवर्षी रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच महावितरणकडून वीजबिल वसूलीची मोहीम राबवली जात आहे. यंदा तर महावितरणकडून विजबिल अदा करण्यासाठी डेडलाईही देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी 22 नोव्हेंबरपर्यंत कृषी पंपाचे बिल अदा केले नाही तर विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून वसुली मोहीम राबवली जात आहे.
लातूर जिल्ह्यात कृषीपंपाकडे 1 हजार 278 कोटींची थकबाकी
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 1 हजार 278 कोटींची थकबाकी आहे. अशाच पध्दतीने प्रत्येक जिल्ह्याची स्थिती असल्याचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितलेले आहे. शिवाय वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीकडे दुसरा पर्यायही नाही. वीजबिल अदा करण्यासाठी विविध योजना लागू करुनही बिल अदा करण्याची मानसिकताच नसल्याने असे पाऊल उचलावे लागत आहे. राज्यात 8 नोव्हेंबरपासून वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. असे असतनाही बिल अदा न केल्यास 22 नोव्हेंबरपासून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडित केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
वातावरण बदलाचा परिणाम माशांच्या दरावर, इंदापूर बाजार समितीमध्ये घटली आवक
कृषी कायदे मागे, मात्र हमीभावाबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
दिवसाकाठी 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ, चार दिवसांपासून सातत्य