आता मोबाईलच्या माध्यमातूनही PM Kisan Sanman Nidhi योजनेची नोंदणी, जाणून घ्या सर्वकाही..!

पीएम किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्ष पूर्ण होत असताना यामध्ये अमूलाग्र बदल केले जात आहेत. यापूर्वी 11 व्या हप्त्यासाठी केवायसी हे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. आता याशिवाय अणखी एक बदल करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी होणे गरजेचे आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएस केंद्रावर जावे लागत होते. मात्र, आता याकरिता एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.

आता मोबाईलच्या माध्यमातूनही PM Kisan Sanman Nidhi योजनेची नोंदणी, जाणून घ्या सर्वकाही..!
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:56 PM

मुंबई :  (PM Kisan Sanman Yojna)पीएम किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्ष पूर्ण होत असताना यामध्ये अमूलाग्र बदल केले जात आहेत. यापूर्वी 11 व्या हप्त्यासाठी केवायसी हे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ज्या (Farmer) शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. आता याशिवाय अणखी एक बदल करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी होणे गरजेचे आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएस केंद्रावर जावे लागत होते. मात्र, आता याकरिता एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. हे (Mobile App) अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुनही शेतकऱ्यांना घरबसल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी करता येणार आहे. एवढेच नाही तर या अॅपच्या माध्यमातून सदरील खात्यावरील रकमेची माहिती मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊ नये आणि अपात्र आहेत त्यांना लाभ मिळू नये यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

GOI अॅपच्या माध्यमातून प्रश्नांची उकल

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना अगदी सहजरित्या व्हावा याकरिता केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक वेळा योजनेचा हप्ता केव्हा जमा झाला हे सामान्य शेतकऱ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे केंद्राने आता GOI (जीओआय) या नावाने मोबाईल अॅप सुरु केले आहे. आतापर्यंत, 5 मिलियन जणांनी तपशील डाउनलोड केला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माहिती केंद्राने हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. मोबाइलच्या गुगल प्ले स्टोअरला भेट देऊन कोणालाही डाउनलोड करता येईल.

GOI मोबाईल अॅप असे करा डाऊलोड

कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये PM Kisan GOI हे मोबाईल अॅप सहज डाउनलोड करता येणार आहे. डाऊनलोड नंतर ज्यांना पीएम किसान निधीसाठी नोंदणी करायची आहे, त्यांना अॅपमध्ये ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर एक नवीन अर्ज समोर येणार आहे. यामध्ये मागितलेली सर्व माहिती व्यक्तींना भरावी लागणार आहे. विचारलेली माहिती पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करावे लागणार आहे. तो मंजूर होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर या अॅप किंवा योजनेशी संबंधित अधिक माहिती पंतप्रधान किसानच्या हेल्पलाइन नंबरवर 155261 येणार आहे. तसेच 011-24300606 या क्रमांकावरूनही मिळविता येईल.

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत 6 हजार

देशातील अल्प भुधारक किंवा अत्यल्प भुधारक अशा शेतकऱ्यांना वर्षात 6 हजार रुपये मिळावे. आर्थिक स्थैर्य देण्यासाठी नाही किमान शेतीव्यवसायातील मलभूत गरजा भागविता याव्यात हा त्यामागचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार या योजनेतील नोंदणीकृत व्यक्तींना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम एका वर्षात दर चौथ्या महिन्याला दिली जाते. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या व्यक्तींच्या खात्यात एकाच वेळी दोन हजार रुपयांची रक्कम पाठवली जाते.

संबंधित बातम्या :

Sugarcane : अतिरिक्त ऊस फडातच त्यात वाढत्या ऊन्हाचा परिणाम, कृषी आयुक्तांच्या आश्वासनानंतरही समस्या कायमच..!

Guarantee Price Centre : बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना आधार खरेदी केंद्राचा, जनजागृतीनंतर आवक वाढली

Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.