दुष्काळात तेरावा.. ! उरलं-सुरलं खरीपही पाण्यात, मराठवाड्यात पावसाची अवकृपा कायम

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. सोयबीन बहरात असल्याने सोयाबीनला तेवढ्या प्रमाणात फटका हा बसलेला नव्हता. मात्र, आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतातील उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे उरलेलं पीकही पाण्यात अशीच काहीशी अवस्था खरिपातील पिकांची ही झालेली आहे.

दुष्काळात तेरावा.. ! उरलं-सुरलं खरीपही पाण्यात, मराठवाड्यात पावसाची अवकृपा कायम
सोयाबीनचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:46 AM

लातूर : 10 दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा पावसाने (Heavy Rain) मराठवाड्यासह, विदर्भात हजेरप लावलेली आहे. (Marathwada) मराठवाड्यातील परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. सोयबीन बहरात असल्याने सोयाबीनला तेवढ्या प्रमाणात फटका हा बसलेला नव्हता. मात्र, आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतातील उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे उरलेलं पीकही पाण्यात अशीच काहीशी अवस्था खरिपातील पिकांची ही झालेली आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या काढणीचा वेग वाढविला होता. काढणीला आलेला उडीद पदरात पाडून घेण्यासाठी रात्रीचा दिवस केला. याप्रमाणेच आता सोयाबीन काढणीचेही नियोजन शेतकऱ्यांकडून सुरु असतानाच मंगळवारी सायंकाळी मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, लातूर या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. जालना जिल्ह्यातील घनसांगवी आणि पारतूर मंडळात तर 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 10 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अजूनही शेत हे चिभडलेलेच आहे.

अणखीन चार दिवस पावसाने उघडीप दिली असती तर सोयाबीन काढणीचाही श्री गणेशा झाला असता मात्र, मंगळवार पासून सुरु झालेल्या पावसामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. पावसाच्या पाण्यात असलेल्या सोयाबीनला थेट कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे आता पदरमोड करून काढणी करावी की आहे ते पिक मोडून रब्बीची तयारी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दहा दिवसाच्या उघडपीदरम्यान शेतकऱ्यांनी उडीदाची काढणी केले. मात्र, काढणी केलेले हे पिकही अजून वावरातच असल्याने यंदा पावसाच्या अवकृपेने सबंध खरीपच पाण्यातच गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

मराठवाड्यात असा झाला पाऊस

मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यातील 19 मंडळात मंवळवारी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन हे पाण्यातच आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात 31, जालना जिल्ह्यातील आंबड येथे 31 घनसांगवी येथे 77, मंथा 66 पातूर 77, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे 47 तर शिरुरअनंतपाळ येथे 30, नांदेड येथील हिमायतनगर येथे 34 र उस्मानाबाद येथे 43 मिलीमीटर पाऊत झाला आहे.

सोयाबीन काढणीचे मोठे अवाहन

खरिपातील मुख्य पिक असलेले सोयाबीन यंदा मात्र, लागवडीपासून अडचणीत होते. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने तर आता अंतिम टप्प्यात असताना अधिकच्या पावसामुळे. अजूनही आठ दिवसाची उघडीप राहिली असती तर काढणीसाठी शेतकऱ्यांना वेळ मिळाला असता आता मात्र, सोयाबीनचा काढणी होते की काढणीपुर्वीच उभ्या सोयाबीनला कोंब फुटणार यामुळे खरीप गेल्याची शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. (Return of rain, kharif crops in water, agricultural production to be hit hard)

संबंधित बातम्या :

16 हजारांची रोपं…लाखोंचा खर्च अन् सिमला मिरची थेट बांधावर

नियोजनबध्द शेती काळाची गरज ; पाणी, वीज आणि रासायनिक खतांचा वापर कमी कृषीमंत्र्याचे अवाहन

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.