उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम शेती व्यवसयाशी निगडीतही झाला आहे. कारण याच देशातून भारताला रासायनिक खतांचा पुरवठा होतो. यंदा पुरवठ्यात विस्कळीतपणा होताच देशात उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. खताप्रमाणेच सुर्यफूल तेलाची अवस्था झाली आहे. खताप्रमाणेच रशिया आणि युक्रेनमधून सुर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली आहे. आता सुर्यफूलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनेच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर
सुर्यफूल क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार राहणार आहे
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 2:55 PM

पुणे : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम शेती व्यवसयाशी निगडीतही झाला आहे. कारण याच देशातून भारताला (Chemical Fertilizer) रासायनिक खतांचा पुरवठा होतो. यंदा पुरवठ्यात विस्कळीतपणा होताच देशात (Production) उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. खताप्रमाणेच सुर्यफूल तेलाची अवस्था झाली आहे. खताप्रमाणेच रशिया आणि युक्रेनमधून  (Sunflower) सुर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली आहे. आता सुर्यफूलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनेच पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही वर्षात पुन्हा सुर्यफूलाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. मात्र, आयातीवर परिणाम झाल्यावरच या गोष्टी देशातील कृषी विभागाच्या निदर्शणास आलेल्या आहेत.

नेमके काय असणार आहे धोरण?

यंदाच्या खरिपापासूनच सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्याअनुशंगाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्य कृषिमंत्र्यांच्या बैठका घेतल्या असून सुर्यफूलाचे क्षेत्र वाढण्याच्य़ा दृष्टीने प्रयत्न करण्याचे अवाहन केले आहे.एवढेच नाही तर सुर्यफूल लागवडीसाठी योजना राबवाव्यात शिवाय देशात कडधान्य, तेलबिया आणि राष्ट्रीय पाम मिशनप्रमाणे सुर्यफूल योजनाही राबवली जाणार आहे. त्याअनुशंगाने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र हरियाना येथील राज्यांच्या अधिकाऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री यांनी बैठक घेतली असून धोरण आखले आहे.

सुर्यफूल पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

18 वर्षापूर्वी म्हणजेच 2004 साली रब्बी हंगामात सुर्यफूल हे 20 लाख 70 हजार हेक्टरावर घेतले जात होते. तर 12 लाख 50 हजार टनाचे उत्पन्न होत होते. मात्र, काळाच्या ओघात ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न तेच पीक वावरामध्ये ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे सुर्यफूलाची जागा ही सोयाबीन, कापसाने घेतली होती. सन 2020-21 मध्ये केवळ 1 लाख 25 हजार हेक्टरावर सुर्यफूलाचा पेरा झाला होता. यंदा पावसामुळे काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, कमी उत्पादनामुळेच सुर्यफूल तेल आयात करण्याची नामुष्की ओढावल्याने आता उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. त्याच अनुशंगाने आता समिती स्थापन करण्यात आली असून यंदाच्या खरिपाापसून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

उत्पादनात घट, तेलाच्या दरात विक्रमी वाढ

सुर्यफूल पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम खाद्य तेलावरही झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या दरात वाढ होत आहे. मध्यंतरी तेलाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयातशुल्क घटवण्याचा निर्धार केला मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याने 1 किलो तेलाच्या पिशवी ही आता 200 रुपयांर्यंत गेले आहे. त्यामुळे तेलाचे दर नियंत्रणात आणाय़चे असतील देशातील तेलबियांच्या क्षेत्रात वाढ करायची हाच पर्याय केंद्रासमोर राहिलेला आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : पालांवरचा पाडवा, ऊसाच्या फडात गुढी अन् ऊसतोड मजुरांचा उत्साह गगणाला भिडणारा

Beed : बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध, मार्ग निघत नसल्याने शेतकरी आक्रमक

Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.