AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान..! तुम्ही मिश्र खतांची तर खरेदी करीत नाहीत ना, राज्यातील 6 कंपन्यांकडून बोगस खताची निर्मिती

उत्पादन वाढीसाठी प्रमाणित बियाणे महत्वाचे आहे. असे असताना राज्यातील 6 खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री, अनाधिकृत खताचा साठा अशा एक ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 6 कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.

Fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान..! तुम्ही मिश्र खतांची तर खरेदी करीत नाहीत ना, राज्यातील 6 कंपन्यांकडून बोगस खताची निर्मिती
रासायनिक खत
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 12:23 PM

पुणे : (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर येत असताना अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. एकतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शिवाय दुसरीकडे (Bogus fertilizer) बोगस खताची निर्मिती केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. ज्या (Agricultural Department) कृषी विभागावर कृषी क्षेत्राचा डोलारा उभा आहे त्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हा प्रकार सुरु असून महाराष्ट्रातील सहा खत कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत. घटते उत्पादन आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आता असे प्रकार समोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे व्हावे हा मोठा प्रश्न आहे.

कंपन्यांकडून अप्रमाणित खताची विक्री

उत्पादन वाढीसाठी प्रमाणित बियाणे महत्वाचे आहे. असे असताना राज्यातील 6 खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री, अनाधिकृत खताचा साठा अशा एक ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 6 कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.कारवाईच्या अनुशंगाने केंद्रातील सहसचिव नीरजा आदीदम यांनी राज्याला एका पत्राद्वारे ही कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

या आहेत त्या 6 खत कंपन्या

राज्यात मिश्र खताची निर्मिती करणाऱ्या 6 कंपन्या समोर आल्या आहेत. यामध्ये सांगली येथील लोकमंगल कंपनी, तसेच येथीलच वसंत अग्रो टेक, नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर अशी या कंपन्यांची नावे आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता कारवाईबाबत काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

खत खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

शेतकऱ्यांकडून एकाच खताची अधिकची मागणी होते. त्यामुळे कृत्रिम तुटवडा भासून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. आता तर मिश्र खताचा सुळसुळाट सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खते घेतात त्यांच्याबाबत असे प्रकार अधिक घडतात.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.