शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी
शेतकरी आता पारंपारिक पिकांच्या शेतीतून नवीन मार्ग स्वीकारत असल्याचं समोर आलं आहे. काही शेतकरी आता औषधी पिकांची लागवड करत आहेत. sarpgandha farming
नवी दिल्ली: शेतकरी आता पारंपारिक पिकांच्या शेतीतून नवीन मार्ग स्वीकारत असल्याचं समोर आलं आहे. काही शेतकरी आता औषधी पिकांची लागवड करत आहेत. कमी उत्पादन खर्च आणि मोठी मागणी यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार औषधी पिकांची शेती फायदेशीर ठरत आहेत. शेतकऱ्यांसमोर सर्पगंधाची शेती करण्याची चांगली संधी आहे. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सर्पगंधाची शेती भारतात 400 वर्षांपासून करण्यात येत आहे.(Sarpgandha farming better source of income for farmers in India medicinal plant snakeroot)
सर्पगंधाची शेती कशी करतात?
सर्पगंधाची शेती तीन प्रकारे केली जाते. सर्पगंधाची कलम बनवून ती 30 पीपीएमच्या एन्डोल अॅसिटिक अॅसिडमध्ये 12 तासांपर्यत बुडूवन ठेवली जातात. यानंतर ती लावली जातात. दुसऱ्या पद्धतीत सर्पगंधांच्या मुळं लावली जातात. मुळं माती भरलेल्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये ठेवली जाता. सर्पगंधाची मूळं एक महिन्यानंतर अंकुरित होतात. तिसऱ्या पद्धतीत बियांची पेरणी केली जाते. सर्पगंधाच्या बियांची पेरणी करणं ही सर्वात चांगली पद्धत मानली जाते. यासाठी सर्पगंधाच्या चांगल्या बियाण्याची निवड करणं आवश्यक आहे. जुनं बियाणं चांगल्या प्रकारे उगवत नाही त्यामुळं नवीन बियाण्याची पेरणी करणं आवश्यक आहे. नर्सरीमध्ये ज्यावेळी रोपाला 4 ते 6 पानं येतात त्यावेळी त्याची लागण केली जाते. सर्पगंधाच्या रोपांना एकदा लागण केल्यानंतर जवळपास 2 वर्षापर्यंत शेतात ठेवलं जातं. यामुळे शेताची पूर्वमशागत चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. शेतात जैविक खत टाकल्यास सर्पगंधाचं चांगलं उत्पादन मिळू शकते.
एक एकरात चार लाख रुपयांची कमाई
सर्पगंधाला फूल आल्यानंतर फळं आणि बिया तयार होण्यासाठी सोडलं जातं. आठवड्यात दोन वेळा तयार झालेल्या बियांची निवड केली जाते. ही प्रक्रिया रोप काढण्यापर्यंत सुरु राहते. काही शेती तज्ज्ञ 30 महिन्याचा कालावधी सर्वात चांगला असतो असं म्हणतात. सर्पगंधाची पान झडल्यानंतर ती मुळापासून काढून टाकली जातात. यानंतर ती वाळवली जातात. शेतकरी याची ज्यावेळी विक्री करतात त्यावेळी मोठी कमाई होते. शेतकऱ्यांच्य माहितीनुसार एका एकरात चार लाख रुपयांची कमाई होते.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग, महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची कमतरता, बीडच्या परळीसाठी 450 बॅगा उपलब्ध
(Sarpgandha farming better source of income for farmers in India medicinal plant snakeroot)