दिमाखात डोलणारी 25 लाखांची केळीची बाग डोळ्यांदेखत भुईसपाट, तोक्ते चक्रीवादळानं शेतकऱ्यांची स्वप्न चक्काचूर

कराड तालुक्यातील चचेगाव येथील ग्रुप शेती करणाऱ्या तीन शेतकऱ्यांच्या केळी बागेला चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा दिला आहे. Banana farm Tauktae Cyclone

दिमाखात डोलणारी 25 लाखांची केळीची बाग डोळ्यांदेखत भुईसपाट, तोक्ते चक्रीवादळानं शेतकऱ्यांची स्वप्न चक्काचूर
कराडचे शेतकरी
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 7:26 PM

सातारा: तौक्ते’ चक्रीवादळात (Tauktae Cyclone) कराड तालुक्यातील चचेगाव येथील काढणीस आलेली सात एकर केळीची बाग भुईसपाट झाली. तीन शेतकऱ्यांचे पंचवीस लाखांचे नुकसान झाले आहे. तोक्ते वादळामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं हतबल शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे. (Satara Karad Chachegaon three farmers Banana farm damaged due to Tauktae Cyclone twenty five lakh rupees loss)

तोक्ते वादळाचा सातऱ्यालाही फटका

तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला जसा बसला आहे. तशाच पद्धतीचा फटका सातारा जिल्ह्यालाही बसला आहे. सातारा जिल्ह्यत अनेक ठिकाण शेतीसह फळबागांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील ग्रुप शेती करणाऱ्या तीन शेतकऱ्यांच्या केळी बागेला चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा दिला आहे. काही दिवसावर काढणीस आलेली सात एकर केळीची बाग वादळात भुईसपाट झाली आहे. तीन शेतकऱ्यांचं 25 लाखाचं नुकसान झालं आहे. काही तासांपूर्वी दिमाखात डोलणारी केळीची बाग डोळ्यांदेखत भुईसपाट झाल्याने उजाड बागेत शेतकरी हताशपणे बसलेले पाहायला मिळाले.

10 लाखांचं कर्ज घेऊन बाग लावली

कराड तालुक्यातील चचेगाव मधील विलास पवार साहेबराव पवार हनुमंत हुलवान यांनी गावातील सोसायटीचे दहा लाख कर्ज घेऊन मे 2020 मध्ये आगाशिव डोंगरालगत सात एकर केळीची लागवड केली. वर्षभरापासून दहा लाखाचा खर्च करून ही बाग चांगली फुलवली होती. या केळी बागेतून 25 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते जोरदार आलेल्या केळी उत्पन्नाने शेतकऱ्यांनी पुढची अनेक स्वप्न पाहिली होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चक्रीवादळाने या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचं व बागेचा चक्काचूर केला. सात एकरावरची केळीबाग भुईसपाट झाली. स्वप्नांचा व बागेचा झालेला चुराडा पाहात शेतकरी बागेत हताशपणे बसून आहेत. आधीच सततच्या लॉकडाऊनमुळे घायकुतीस आलेले शेतकरी वादळाच्या तडाख्याने पूर्ण कोलमडून पडले आहेत

पंचनामे झाले मदतीची प्रतीक्षा

बागेसासाठी घेतलेले सेवा सोसायटीचे कर्ज, स्वता जवळची वापरलेली जमापुंजी आता बाग साफ करण्यासाठी येणारा खर्च या चिंतेचे वादळ आता त्या शेतकऱ्यांना सतावत आहे. सरकारने नुकसान भरपाई सह बागेसाठी घेतलेले सोसायटीचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी विलास पवार यांनी केली आहे. शासनाच्या कृषी व महसूल खात्याने या केळी बाग नुकसानाचे पंचनामे केले असून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती कृषी अधिकारी बाळासाहेब माळी यांनी दिली.

सरकार त्यांच्या नियमाप्रमाणे या नुकसानाची भरपाई करेल पण तेवढ्याने शेतकऱ्यांना उभारी येणार नाही. कोरोनामुळे शेतकरी अगोदरच नुकसानात असून शेतकऱ्यांनी पिकासाठी घेतलेले कर्ज माफ करावं. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टोकाची प्रतिक्रिया ही साहेबराव पवार चा शेतकऱ्यांनं दिली. वादळात बाग भुईसपाट झाल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकारने नुकसान भरपाईसह बागेसाठी घेतलेली कर्ज माफ करावीत, अशी मागणी शेतकरी करत आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादकांनी बनवलेली आधुनिक अवजारं मिळणार: दादाजी भुसे

कोरोनाच्या संकटात आदिवासी युवकांच्या प्रयत्नांना मोठं यश, गुळवेल पुरवठ्यासाठी मिळाली दीड कोटी रुपयांची ऑर्डर

(Satara Karad Chachegaon three farmers Banana farm damaged due to Tauktae Cyclone twenty five lakh rupees loss)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.