सातारच्या पठ्ठ्याची अभिमानास्पद कामगिरी, स्वप्नवत ऊस भरणी मशीन वास्तवात साकारली

शेती आणि मातीशी एकरुप असणाऱ्या एका अवलिया अभियंताने ऊसतोड मजुरांचा त्रास वाचावा यासाठी एक नाविण्यपूर्ण असं मशीन तयार केलं आहे (Satara Yourth made machine for cane filling in tractor).

सातारच्या पठ्ठ्याची अभिमानास्पद कामगिरी, स्वप्नवत ऊस भरणी मशीन वास्तवात साकारली
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 5:46 PM

सातारा : शेती आणि मातीशी एकरुप असणाऱ्या एका अवलिया अभियंताने ऊसतोड मजुरांचा त्रास वाचावा यासाठी एक नाविण्यपूर्ण असं मशीन तयार केलं आहे. या यंत्राचं नाव ऊस भरणी यंत्र असं आहे. ऊस कापनीनंतर ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी मजुरांना जी कसरत करावी लागते, ती कमी करण्यासाठी या अवलिया अभियंताने थेट मशीन बनवलं आहे. या मशीनची अजिंक्यतारा, सह्याद्री साखर काररखान्याचे, अधिकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाहणी केली आहे. अनेक जण पाहता क्षणी या मशीनच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, काही अधिकृत चाचपण्या पूर्ण झाल्यानंतर बाजारात ही मशीन उपलब्ध होणार आहे (Satara Yourth made machine for cane filling in tractor).

ऊस भरणीसाठी विशेष मशीन तयार करणाऱ्या या अवलिया अभियंताचे नाव सनी दिलिप काळभोर आहे. साताऱ्याच्या रामकृष्णनगर हे त्याचं मूळगाव आहे. लॉकडाऊन काळात पुण्याहून गावी आल्यानंतर ऊस भरणीचं मशीन तयार करण्याची कल्पना त्याला सूचली. ही कल्पना त्याने प्रत्यक्षात राबवली आणि एक स्वप्न सत्यात उतरलं. त्याच्या या कामांचं संपूर्ण साताऱ्यात चर्चा सुरु आहे. सनीने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्याने आपला प्रवास सांगतिला (Satara Yourth made machine for cane filling in tractor).

“मी मॅकेनिकल इंजिनिअर आहे. माझा स्वत:चा एक मशीन डिझाईनचा एक व्यवसाय आहे. मी सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. गेल्या दिवाळीला मी मशीन बनवण्याची तयारी सुरु केली. लॉकडाऊन काळात मी गावी गेलो होतो. लॉकडाऊनदरम्यान ऊसतोड मजूरही गावीच अडकले होते. त्यावेळी त्यांच्या चर्चा ऐकायचो. ऊसतोड करताना कोणत्या समस्या येतात. ते जाणवलं. त्यामुळे मनात या ऊसतोडणीसाठी आपण एक मशीन तयार करु शकतो, असं लक्षात आलं”, असं सनीने सांगितलं.

“ऊस तोडणीत कष्ट तर आहेच. मात्र, ऊस भरणी हे जास्त कसरतीचं काम आहे. शेतात ट्रॅक्टर घेऊन जाणं, ट्रेलर भरणं, गाडी भरल्यानंतर ते ट्रॅक्टर रस्त्यावर आणणं. बऱ्याचदा शेतातील खड्ड्यांमुळे गाडी पलीट होण्याची देखील भीती असते. अनेकवेळा तसे भयानक अपघातही झाले आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढणारं मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मशीनची डिझाईन तयार केली. त्यानंतर ती तयार केली. सुरुवातीला एवढी मोठी मशीन शेतात कशी घेऊन जायची? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मी त्यामध्ये फोल्डिंगची सुविधा केली. याशिवाय ते मशीन ट्रॅक्टरला जोडलं तर आपण कुठेही ते मशीन घेऊन जाऊ शकतो. याशिवाय शेतात 50 ते 150 फुटापर्यंत वाढवू शकतो”, अशी माहिती सनीने दिली.

“मी मॅकेनिकल इंजेनिअर आहे. सुरुवातीला जॉब केला. त्यानंतर फ्रिलान्सिंग केलं. त्यानंतर स्वत:ची एक छोटी कंपनी तयार केली. संघर्ष करत करत शेतीसाठी आपण काही करु शकतो का असा विचार मनात आला. त्यातूनची ही संकल्पना साकारता आली”, असंदेखील सनीने सांगितलं.

यंत्राचे वैशिष्ट्ये काय?

या यंत्राद्वारे दिवसभरात 70 ते 75 टन ऊस ट्रेलरवर भरला जातो. विशेष म्हणजे अवघ्या 45 मिनिटात संपूर्ण एक ट्रेलर भरला जातो. या मशीनमुळे मजुरांचा ऊस भरणीचा वेळ वाचेल. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना मजूर शोधूनही मिळत नाही, त्यांच्यासाठी हे मशीन तर एक प्रचंड फायदेशीर आहे. शेताच्या लांबीनुसार या मशीनची लांबी कमी-जास्त करता येते. विशेष म्हणजे 5 टन ऊस भरण्यासाठी फक्त एक लिटर डिझेल लागते. त्याचबरोबर ऊसतोडणीवरील मजुरांचा खर्च निम्म्यावर येईल.

अभियंता सनी काळभोरचा फोन नंबर : 8390781013 

हेही वाचा : लातुरात तुरीची आवक वाढली, शेतकऱ्यांना भाव पडण्याची भीती?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.